रेणा कारखाना विनाविलंब कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:25 IST2021-08-18T04:25:52+5:302021-08-18T04:25:52+5:30

रेणा साखर कारखान्याच्या मिल रोलच्या पूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ. ॲड. त्र्यंबक भिसे, साखर महासंघाचे उपाध्यक्ष ...

Rena factory will grind sugarcane in the field immediately | रेणा कारखाना विनाविलंब कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करणार

रेणा कारखाना विनाविलंब कार्यक्षेत्रातील ऊस गाळप करणार

रेणा साखर कारखान्याच्या मिल रोलच्या पूजन कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आ. ॲड. त्र्यंबक भिसे, साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, जिल्हा बँकेचे व्हॉईस चेअरमन पृथ्वीराज शिरसाठ, रेणा कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, व्हॉईस चेअरमन अनंतराव देशमुख, माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जिल्हा बँकेचे संचालक संभाजीराव सुळ यांची उपस्थिती होती. माजी मंत्री दिलीपराव देशमुख म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व भागात उसाची लागवड मोठ्या प्रमाणावर झालेली आहे. ऊस उत्पादक शेतकरी हा केंद्रबिंदू मानून सर्व सभासदांची आर्थिक प्रगती व्हावी, यासाठी मांजरा परिवाराने सहकार्याची भावना ठेवली आहे. त्या दृष्टीने संचालक मंडळ काम करीत असून, यावर्षीही कारखाना गाळप उद्दिष्ट पूर्ण करेल. यावेळी रेणा साखर कारखान्याचे संचालक धनराज देशमुख, संजय हरिदास, संग्राम माटेकर, प्रवीण पाटील, संभाजी रेड्डी, शहाजी हाके, तानाजी कांबळे, संचालिका अमृताताई देशमुख, वैशालीताई माने, स्नेहल देशमुख, पंडित माने, कार्यकारी संचालक बी.व्ही. मोरे, सचिव आर. बी. बरमदे, चीफ अकाउंट के.पी. आकोसकर, एस.आर. मोरे, एस.एस. भोसले, डी.बी. देशमुख, उरगुंडे, अमित काकडे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Rena factory will grind sugarcane in the field immediately

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.