बँकांकडून होणारी अडवणूक दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:24 IST2021-08-20T04:24:52+5:302021-08-20T04:24:52+5:30
अहमदपूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जवाटप प्रकरणी नागरिकांची होणारी अडवणूक थांबवून, जलदगतीने कर्ज मंजुरीसाठी बँकांना आदेशित करावे, अशी ...

बँकांकडून होणारी अडवणूक दूर करा
अहमदपूर : लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांकडून कर्जवाटप प्रकरणी नागरिकांची होणारी अडवणूक थांबवून, जलदगतीने कर्ज मंजुरीसाठी बँकांना आदेशित करावे, अशी मागणी डाॅ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
जिल्ह्यात राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून कर्जवाटपात अडवणूक केली जात आहे. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी आहेत. कर्ज प्रकरणासाठी लाभार्थ्यांना बॅंकेत चकरा माराव्या लागतात. शासनाने जनतेसाठी विविध शासकीय योजना जाहीर केल्या आहेत. मात्र, केवळ बॅंकांच्या असहकार्यामुळे कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत. शासनाने नेमून दिलेले उद्दिष्टही वेळेत पूर्ण केले जात नाही. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज, व्यापाऱ्यांना व सुशिक्षित बेरोजगारांना उद्योगधंद्यासाठीचे कर्ज, मुद्रा योजना, विविध मागासवर्गीय महामंडळे, दिव्यांगांच्या कर्जाच्या योजना, महिला बचतगट, वैयक्तिक कर्ज योजना आदी कर्जाची प्रकरणे दाखल केली जातात. मात्र, नियमात असूनही कर्ज मंजूर करण्यासाठी बँकांकडून टाळाटाळ होत आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँकांच्या प्रलंबित कर्ज प्रकरणांचा आढावा घेऊन पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज प्रकरणांना तातडीने मंजुरी देण्याबाबत आदेशित करावे, अशी मागणी डाॅ. सिद्धार्थकुमार सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.