हत्तीबेटाचे उर्वरित क्षेत्र सह्याद्री-देवराई विकसित करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:25 IST2021-08-17T04:25:54+5:302021-08-17T04:25:54+5:30

उदगीर : जिल्ह्यातील ब वर्गीय पर्यटनस्थळ असलेल्या हत्तीबेट पर्यटन स्थळाचे उर्वरित क्षेत्र सह्याद्री-देवराई प्रतिष्ठानकडून विकसित करण्यात येईल, अशी ...

The remaining area of Hattibeta will be developed by Sahyadri-Devrai | हत्तीबेटाचे उर्वरित क्षेत्र सह्याद्री-देवराई विकसित करणार

हत्तीबेटाचे उर्वरित क्षेत्र सह्याद्री-देवराई विकसित करणार

उदगीर : जिल्ह्यातील ब वर्गीय पर्यटनस्थळ असलेल्या हत्तीबेट पर्यटन स्थळाचे उर्वरित क्षेत्र सह्याद्री-देवराई प्रतिष्ठानकडून विकसित करण्यात येईल, अशी घोषणा सह्याद्री-देवराई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष व सिनेअभिनेते सयाजीराव शिंदे यांनी रविवारी केली.

हत्तीबेट पर्यटन स्थळाच्या डोंगरावर पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे व सिनेअभिनेते सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते फुलपाखरू उद्यानाचा प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी वृक्षारोपणही करण्यात आले.

कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, वृक्षमित्र रमेश अंबरखाने, सभापती शिवाजी मुळे, ज्ञानेश्वर पाटील, नाम फाऊंडेशनचे विलास चामे, सह्याद्री-देवराईचे जिल्हा समन्वयक सुपर्ण जगताप, डॉ. बी. आर. पाटील, अमृत सोनवणे, ॲड. सुपोषपाणी आर्य, सौदागर कदम, युवराज धोतरे, चंद्रप्रकाश खटके, अभिजीत साकोळकर, सतीश खरात, भालेराव जाधव, लक्ष्मण बतले, गजानन बिरादार, विभागाच्या सहाय्यक वनसंरक्षक व्ही. बी. तांबे, वनपरिक्षेत्र अधिकारी शिल्पा गीते, वन परिमंडळ अधिकारी गोविंद माळी, तुकाराम वंजे, गंगाधर काळे, वनरक्षक श्रीकृष्ण मामडगे, सुभाष वटपलवार, वन कर्मचारी विठ्ठल सूर्यवंशी, देविदास डोंबाळे आदी उपस्थित होते.

प्रारंभी व्ही. एस. कुलकर्णी व गंगा महाराज यांनी पाहुण्यांचा सत्कार केला. तसेच हत्तीबेटावर राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली.

फोटो ओळ : हत्तीबेटावर सुरु करण्यात येत असलेल्या फुलपाखरू उद्यानाच्या कामाचा प्रारंभ पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, सिनेअभिनेते व सह्याद्री-देवराई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सयाजीराव शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बसवराज पाटील नागराळकर, सुपर्ण जगताप, तहसीलदार रामेश्वर गोरे उपस्थित होते.

Web Title: The remaining area of Hattibeta will be developed by Sahyadri-Devrai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.