तिरुपती, मुंबईला नियमित रेल्वे सुरू करण्यात यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:21+5:302021-07-18T04:15:21+5:30

दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबादचे विभागीय व्यवस्थापक अभय कुमार गुप्ता हे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत उदगीर दौऱ्यावर आले होते. तेव्हा उदगीर ...

Regular trains should be started to Tirupati, Mumbai | तिरुपती, मुंबईला नियमित रेल्वे सुरू करण्यात यावी

तिरुपती, मुंबईला नियमित रेल्वे सुरू करण्यात यावी

दक्षिण मध्य रेल्वेच्या सिकंदराबादचे विभागीय व्यवस्थापक अभय कुमार गुप्ता हे विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत उदगीर दौऱ्यावर आले होते. तेव्हा उदगीर रेल्वे संघर्ष समितीच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी सचिव मोतीलाल डोईजोडे यांनी प्रत्येक मागण्यांविषयी पुरावे व माहिती दिली. यावेळी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, सभापती मनोज पुदाले, नगरसेवक ॲड. दत्ता पाटील, साईनाथ चिमेगावे, प्रशांत मांगुळकर, संदीप हुडे, उमाकांत वडजे, अहमद सरवर, विक्रम हलकीकर, रवींद्र हसरगुंडे, इरफान शेख, माधव रोडगे, श्रीनिवास सोनी, स्टेशन अधीक्षक दीपक जोशी, उपअधीक्षक गोपाल यादव आदी उपस्थित होते.

उदगीर रेल्वे स्थानकातून वाहतुकीतून मिळणाऱ्या उत्पन्नाविषयी समाधान व्यक्त करून आपल्या मागण्यांविषयी महाव्यवस्थापक व रेल्वे बोर्डकडे पाठपुरावा करणार असल्याचे गुप्ता यांनी सांगितले. तसेच सीसीटीव्ही व कोच आयडेंटिटीफिकेशन बोर्ड‌्स त्वरित बसविण्याची सुरुवात करण्याचे आदेशही दिले.

Web Title: Regular trains should be started to Tirupati, Mumbai