कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून पॉझिटिव्हिटी रेट कमी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST2021-05-28T04:15:54+5:302021-05-28T04:15:54+5:30

काळजी घेतल्यास संभाव्य लाट येणारही नाही आरोग्य यंत्रणेच्या अंदाजानुसार ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये संभाव्य तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात ...

Reduce the positivity rate by increasing the number of corona tests | कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून पॉझिटिव्हिटी रेट कमी करा

कोरोना चाचण्यांची संख्या वाढवून पॉझिटिव्हिटी रेट कमी करा

काळजी घेतल्यास संभाव्य लाट येणारही नाही

आरोग्य यंत्रणेच्या अंदाजानुसार ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये संभाव्य तिसरी लाट येण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या अनुषंगाने प्रशासनाने योग्य ती तयारी करून ठेवावी. नागरिकांनी योग्य ती काळजी घेतल्यास आणि कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केल्यास संभाव्य लाट जिल्ह्यात येणारच नाही. जरी आली तरी तिचा परिणाम कमी प्रमाणात राहील. त्यामुळे नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहनही पालकमंत्री अमित देशमुख यांनी केले.

जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे १३ प्लँट

जिल्ह्यात कोरोनामुळे २ हजार ३२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न आरोग्य यंत्रणेचा आहे. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, मेडिकल कॉलेजमध्ये ऑक्सिजन बेड निर्माण केले आहेत. तसेच जिल्ह्यात ऑक्सिजन निर्मितीचे १३ प्लँट सुरू झाल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

यावेळी आ. विक्रम काळे, आ. धीरज देशमुख, महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सूचना केल्या. ग्रामीण भागात कोरोनाची स्थिती तसेच तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने डॉ. गंगाधर परगे यांनी माहिती दिली. तर अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कोरोना रुग्णावरील उपचार संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने माहिती दिली.

Web Title: Reduce the positivity rate by increasing the number of corona tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.