देवणीत विक्रमी पाऊस; बोरोळ येथील पाझर तलाव फुटला तर धनेगाव बंधाऱ्यास गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 01:15 PM2020-09-16T13:15:09+5:302020-09-16T13:20:59+5:30

पावसाने तालुक्याचे सरासरी पर्जन्यमानाची आठशे मिलिमीटरची सीमा ओलांडली आहे.

Record rainfall in Devani; The seepage lake at Borol bursts and the Dhanegaon dam leakage | देवणीत विक्रमी पाऊस; बोरोळ येथील पाझर तलाव फुटला तर धनेगाव बंधाऱ्यास गळती

देवणीत विक्रमी पाऊस; बोरोळ येथील पाझर तलाव फुटला तर धनेगाव बंधाऱ्यास गळती

Next
ठळक मुद्दे बोरोळ या महसूल मंडळात 155 मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस सोयाबीन या मुख्य पिकाच्या काढणीला मोठा फटका

देवणी ( लातूर ) : तालुक्यात मान्सून परतीच्या पावसाने कहर केला असून तालुक्यात आजपर्यंत सरासरी ८८६.६६ मिलिमीटर इतका पाऊस झाला असून पावसाची टक्केवारी ही १०९.७७ टक्के इथपर्यंत पोहोचली आहे. पावसाने तालुक्याचे सरासरी पर्जन्यमानाची आठशे मिलिमीटरची सीमा ओलांडली आहे.

काल तालुक्यातील बोरोळ या महसूल मंडळात 155 मिलिमीटर इतका विक्रमी पाऊस होऊन ढगफुटी सदृश्य परिस्थिती झाली आहे. या पावसामुळे मौजे बोरोळ येथील एक पाझर तलाव पण फुटला आहे. तर धनेगाव येथील उच्चस्तरीय बंधाऱ्यास गळती लागली आहे. शिवाय तालुक्यातील नवे जुने रस्ते उखडल्याने व नाल्यांना पाणी आल्याने ग्रामीण भागातील अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

या पावसामुळे तालुक्यातील सोयाबीन या मुख्य पिकाच्या काढणीला मोठा फटका बसत आहे. मात्र, या परतीच्या पावसाने तालुक्यातील मांजरा व देव आणि मानमोडी या नद्यांना पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. शिवाय तालुक्यातील धनेगाव उच्चस्तरीय बंधारा भोकनी मध्यम प्रकल्प यांच्यासह साठवण व पाझर तलाव आणि विहिरी व बोर यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे.

Web Title: Record rainfall in Devani; The seepage lake at Borol bursts and the Dhanegaon dam leakage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.