स्वामी विवेकानंद विद्यालय येथे सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:15 AM2021-06-20T04:15:04+5:302021-06-20T04:15:04+5:30

लातूर रेल्वेस्थानक परिसरात वृक्षारोपण लातूर : शिवसेना जिल्हा शाखा लातूर व वृक्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी लातूर ...

Reception at Swami Vivekananda Vidyalaya | स्वामी विवेकानंद विद्यालय येथे सत्कार

स्वामी विवेकानंद विद्यालय येथे सत्कार

Next

लातूर रेल्वेस्थानक परिसरात वृक्षारोपण

लातूर : शिवसेना जिल्हा शाखा लातूर व वृक्ष प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी लातूर रेल्वेस्थानक परिसरात १०१ वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा कार्यालय प्रमुख दिनेश बोरा, रेल्वेस्थानक प्रबंधक तिवारी, संदीप जाधव, लातूर वृक्ष प्रतिष्ठानच्या सुनंदा जगताप, चंद्रकांत शिंदे, प्रा. गरड, पी. विवेकानंद, महेश सलगर, बालाजी चामे, आदित्य सूर्यवंशी, शुभम पाटील, अनिता देशपांडे, अरिहंत किवंडे आदींची उपस्थिती होती. यावेळी १०१ वृक्षांची लागवड करण्यात आली, तसेच संगोपन करण्याची शपथ देण्यात आली.

खोपेगाव येथे वृक्षलागवडीची केली पाहणी

लातूर : तालुक्यातील जि. प. प्रशाला खोपेगाव येथे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी भेट देऊन मियावॉकीअंतर्गत वृक्षलागवडीची पाहणी केली, तसेच सूचना केल्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, गटशिक्षणाधिकारी धनंजय गिते, केंद्र प्रमुख मेनगुले, मुख्याध्यापक अन्वर पटेल, लक्ष्मण मोरे, रवि मोरे, अमोल घायाळ, दीपक मोरे आदींसह शिक्षक, कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते. या परिसरात ९ हजार ७०० वृक्षांची लागवड करण्यात आली होती. आता पुन्हा ८५०० वृक्षलागवड केली जाणार असून, पूर्वतयारीची सीईओ गोयल यांनी पाहणी केली.

वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण मोहीम

लातूर : शहरातील वसुंधरा प्रतिष्ठानच्या वतीने ट्री गार्डसह अकरा वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रा. योगेश शर्मा, नूतन अध्यक्ष ॲड. अजित चिखलीकर, अजय सिंगनाथ, अमोल कुलकर्णी, विशाल वळसणे, प्रवीण कुंभार, अजय वळसणे, ऋषिकेश मेकले, रोहित कांबळे, निखिल वळसणे, गजानन दमदरे, डॉ. शिवकुमार इजारे, प्रशांत शिंदे, रोहित चवळे, गणेश पांचाळ, सचिन शिंदे, प्रीतम ढगे, करणसिंग टाक, ओमकार पोलदासे, गोविंद गौड, सूरज इगवे, सौदागर इजारे आदींची उपस्थिती होती.

मुख्य चौकातील खड्ड्यांमुळे गैरसोय

लातूर : शहरातील राजीव गांधी चौक परिसरात मुख्य चौकात रस्त्याच्या मधोमध खड्डा पडला आहे. त्यामुळे वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या रस्त्यावरून दिवसभर वाहनांची मोठी वर्दळ असते. खड्डे चुकविताना अपघाताचा धोका असल्याने संबंधित विभागाने तत्काळ खड्डे बुजविण्याची मागणी वाहनधारकांसह नागरिकांमधून होत आहे. याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

विजेचा लपंडाव; नागरिक त्रस्त

लातूर : शहरात विजेचा लपंडाव सुरू आहे. दुपार आणि सायंकाळच्या वेळी अचानक वीज गुल होत असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, नियमित बिल भरूनही महावितरणच्या दुर्लक्षामुळे गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महावितरणकडे वारंवार पाठपुरावा करूनही विजेचा लपंडाव सुरूच आहे. याकडे तत्काळ लक्ष देण्याची मागणी शहरातील नागरिकांमधून केली जात आहे.

Web Title: Reception at Swami Vivekananda Vidyalaya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.