मराठा सेवा संघ पदाधिकाऱ्यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:18 IST2021-01-21T04:18:20+5:302021-01-21T04:18:20+5:30

पोउपनि. वाघमारे यांचा सत्कार लातूर : विवेकनंद चौक पोलीस ठाण्यात रूजू झालेल्या पोलीस उपनिरीक्षक सीता वाघमारे यांचा संत गोरोबा ...

Reception of Maratha Seva Sangh office bearers | मराठा सेवा संघ पदाधिकाऱ्यांचा सत्कार

मराठा सेवा संघ पदाधिकाऱ्यांचा सत्कार

पोउपनि. वाघमारे यांचा सत्कार

लातूर : विवेकनंद चौक पोलीस ठाण्यात रूजू झालेल्या पोलीस उपनिरीक्षक सीता वाघमारे यांचा संत गोरोबा सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विकास कांबळे, शारदा बनसोडे, नागेश कांबळे, सुरेश वाघमारे, मयूर बनसोडे, रुपेश गायकवाड, विजयकुमार बनसोडे, वैभव कांबळे, राजू गवळी, सिद्धार्थ सूर्यवंशी, जी.ए. गायकवाड, कलूबाई डुमणे, वत्सला गायकवाड यांची उपस्थिती होती.

टेनिसबॉल क्रिकेट स्पर्धा

लातूर : शौर्य फाऊंडेशनच्या वतीने एलआयसी कॉलनी येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा घेण्यात येत आहेत. उद्‌घाटन नगरसेवक सुनील मलवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गणेश गवारे, सचिंद्र कांबळे, भैय्या वाघमारे, मंगेश सोनकांबळे, गोविंद कांबळे, विकास कांबळे, विजय कांबळे, शोएब पठाण, गोपाळ घोरपडे, आकाश गायकवाड उपस्थित होते.

मसापच्या वतीने कविसंमेलनाचे आयोजन

लातूर : मराठवाडा साहित्य परिषद लातूर, महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळ मुंबई आणि जयक्रांती महाविद्यालयाच्या वतीने भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त गुरुवारी सायंकाळी ५ वाजता महाविद्यालयात कविसंमेलन घेण्यात येणार आहे. यामध्ये कवी योगिराज माने, डॉ. शेषेराव मोहिते उपस्थित राहणार आहेत. सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. दुष्यंत कठारे, विवेक सौताडेकर, प्रकाश घादगिने, शैलजा कारंडे, नरसिंग इंगळे, सुनीता आरळीकर, डॉ. संगीता मोरे यांनी केले आहे.

जिल्हा आजारी उद्योग संघटनेचे निवेदन

लातूर : नांदेड एमआयडीसीप्रमाणे लातूर एमआयडीसी प्रॉपर्टी टॅक्समधून मनपा हद्दीतून वगळावी तसेच उद्योजकांना लाईट, पाणी, बिल्डींग कम्प्लीशन व परवानगी या सर्व गोष्टी एमआयडीसीकडून देण्यात येतात. एमआयडीसी ही प्रॉपर्टी टॅक्समधून वगळणे व महापालिकेच्या हद्दीतून वगळावी, या मागणीसाठी लातूर जिल्हा आजारी उद्योग संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. निवेदनावर ॲड. चंद्रकांत पाटील आदींसह लातूर जिल्हा आजारी उद्योग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

सोनार समाजातील गुणवंतांचा सत्कार

लातूर : जिल्ह्यातील पांचाळ सोनार समाजातील दहावी, बारावीमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ जिल्हा सोनार समाज सेवा संघाच्या वतीने १४ फेब्रुवारी २०२१ रोजी श्रीकालिकादेवी मंदिर जुना औसा रोड लातूर येथे दुपारी २ वाजता आयोजित करण्यात आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांनी कार्याध्यक्ष रविंद्र बारसकर यांच्याकडे गुणपत्रिका जमा करावेत, असे आवाहन लातूर जिल्हा सोनार सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे. निवेदनावर डॉ. दीपक वेदपाठक, सचिव विवेक पंडित, ज्ञानोबा महामुनी, अमोल दैठणकर, संजय बारसकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

दिनकर पाटील यांनी स्वीकराला पदभार

लातूर : दिनकर पाटील यांनी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे पदाचा अतिरिक्त कार्यभार ३१ डिसेंबर रोजी स्वीकारला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे करावायच्या पत्रव्यवहाराचा पत्ता बदलला आहे. दिनकर पाटील अध्यक्ष महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे-४११००४ हा नवीन पत्ता असून, याची नोंद घ्यावी, असे आवाहन लातूर विभागीय मंडळाचे सचिव सुधाकर तेलंग यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.

गोंदेगाव ग्रामविकास पॅनलचा सत्कार

लातूर : तालुक्यातील गोंदेगाव ग्रामपंचायतीमध्ये ग्रामविकास पॅनलच्या ६ उमेदवारांनी विजय मिळविला. त्यांचा माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी विश्वनाथ खैरे, शरणाप्पा स्वामी, ज्ञानोबा बेडे, नितीन बेडे, जयराम सोनवणे, पांडुरंग देशमुख, बाबासाहेब देशमुख, बाळासाहेब देशमुख, भाऊसाहेब देडे, संगमेश्वर स्वामी, विक्रम देशमुख, विनायक स्वामी, योगेश स्वामी, श्रीराम देडे, अमोल देडे, आप्पा देडे यांची उपस्थिती होती.

श्री केशवराज विद्यालयात ऑनलाईन मेळावा

लातूर : येथील श्री केशवराज विद्यालयात मकर संक्रांतीनिमित्त ऑनलाईन पालक मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी वर्षाताई शेटे, डॉ. अंजलीताई देव, अमरजाताई कुलकर्णी, राजश्री कुलकर्णी, तेजस्विनी सांजेकर, क्षमा कुलकर्णी, राजश्री कुलकर्णी, इंदू ठाकूर, सुनीता बनसोडे, कांचन तोडकर, सुप्रिया सावंत, मनीषाताई टोपरे, स्वप्ना सेलूकर आदींसह पालक, विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. यावेळी विविध विषयांवर पालकांना मार्गदर्शन करण्यात आले.

महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात कार्यक्रम

लातूर : येथील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात ऑनलाईन राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, डॉ. अंबादास मोहिते, डॉ. बसवराज लावाणी, डॉ. घनशाम येळणे, डॉ. अंजली कुलकर्णी यांनी मार्गदर्शन केले. यशस्वितेसाठी डॉ. दिनेश मौने, डॉ. संजय गवई, प्रा. काशिनाथ पवार, प्रा. आशिष स्वामी, प्रा. दत्ता कारंडे, प्रा. मंगल पवार, प्रा. नागेश जाधव आदींनी परिश्रम घेतले.

Web Title: Reception of Maratha Seva Sangh office bearers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.