लहूजी सेनेतर्फे करडखेल पाटी येथे रास्ता रोको आंदोलन
By संदीप शिंदे | Updated: December 11, 2023 18:29 IST2023-12-11T18:29:15+5:302023-12-11T18:29:48+5:30
अ.ब.क.ड. आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी

लहूजी सेनेतर्फे करडखेल पाटी येथे रास्ता रोको आंदोलन
लोहारा : उदगीर तालुक्यातील करडखेल पाटी चौरस्त्यावर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने विविध मागण्यासाठी सोमवारी सकाळी ११ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास देण्यात आले. दरम्यान, आंदोलनामुळे उदगीर-नळेगाव-लातूर व करडखेल-हेर- वलांडी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.
शासनाने मातंग समाजाचा अ.ब.क.ड. आरक्षण वर्गीकरणाचा प्रश्न तात्काळ निकाली काढावा, अनुसुचित जाती आरक्षणात अ.ब.क.ड. वर्गीकरण करून मातंग समाजास उपेक्षित वंचित जातींना आरक्षणाचा लाभ मिळवून द्यावा, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन मुंबई विद्यापीठास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे, आर्टी या संस्थेची बार्टीच्या धर्तीवर स्थापना करण्यात यावी, लहुजी वस्ताद साळवे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या.
यावेळी मंडळ अधिकारी पंडित जाधव, तलाठी संतोष पाटील, सचिन बिरादार, पोलीस पाटील एकनाथ कसबे यांना निवेदन देण्यात आले. आंदोलनात रुपेंद्र चव्हाण, पांडूरंग कसबे, मनोहर कसबे, सतिश कसबे, प्रा. पंडित सुर्यवंशी, उद्धव शिंदे, ॲड. विष्णू लांडगे, ॲड. योगेश उदगीरकर, बालाजी कांबळे, गुरुभाऊ कांबळे, संतोष रणक्षेत्रे, नेताजी कांबळे, परमेश्वर मदने, तिरुपती कसबे, व्यंकटभाऊ कसबे, छायाताई कसबे, बालिकाबाई शिंदे, निलावती कसबे, रेखाबाई कसबे, सविता कसबे, अर्चना कसबे, पुजाताई कसबे आदी उपस्थित होते. यावेळी पोलीस उपनिरीक्षक तानाजी चेरले, श्रीमंल आदींसह पोलीस कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवला होता.