वलांडीच्या सरपंचपदी राणीताई भंडारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:20 IST2021-02-11T04:20:56+5:302021-02-11T04:20:56+5:30
येथील ग्रामपंचायत कार्यालयात अध्यासी अधिकारी डी. ए. मस्के यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी ...

वलांडीच्या सरपंचपदी राणीताई भंडारे
येथील ग्रामपंचायत कार्यालयात अध्यासी अधिकारी डी. ए. मस्के यांच्या अध्यक्षतेखाली नूतन सदस्यांची बैठक बोलाविण्यात आली होती. सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असल्याने राणीताई भंडारे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. उपसरपंचपदासाठी महेमूद सौदागर व नवनाथ सोनकवडे यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यामुळे मतदान घेण्यात आले. त्यात सोनकवडे यांना चार, तर सौदागर यांना ९ मते पडली. त्यामुळे महेमूद सौदागर यांची उपसरपंचपदी निवड झाली.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना मंडल अधिकारी अब्रार शेख, ग्रामविकास अधिकारी विष्णू माने यांनी साहाय्य केले. यावेळी नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा रामभाऊ भंडारे, नागेश बदननाळे, धनराज बिरादार, भालचंद्र भंडारे, ज्ञानेश्वर भंडारे, हकीम बावडीवाले यांचा ग्रामस्थांनी सत्कार केला. निवडीवेळी सहायक पोलीस निरीक्षक पंकज शिनगारे, सहायक फौजदार नारायण दंपलवाड, पोलीस नाईक देवीदास किवनडे यांनी बंदोबस्त ठेवला होता.