चाकुरातील २४ गावांत रणधुमाळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:36 IST2020-12-15T04:36:09+5:302020-12-15T04:36:09+5:30
तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा कार्यकाल संपुष्टात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणूका पुढे ढकलल्या. दरम्यान, प्रशासक नियुक्त करण्यात ...

चाकुरातील २४ गावांत रणधुमाळी
तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या सरपंचांचा कार्यकाल संपुष्टात आला होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने निवडणूका पुढे ढकलल्या. दरम्यान, प्रशासक नियुक्त करण्यात आले होते. तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींत अजनसोंडा (बु), उजळंब, कडमुळी, कबनसांगवी, केंद्रेवाडी, जगळपूर (खु.), झरी (खु.), वडवळ (नागनाथ), शिवणखेड (बु.), शेळगाव, हाडोळी गावांचा समावेश आहे. तालुक्यात सर्वात मोठी ग्रामपंचायत नळेगाव असून सरपंचपद हे खुले असल्याने तिथे चुरशीची निवडणूक होणार आहे.
महिलांसाठी कडमुळी, कबनसांगवी, जगळपूर (खु.), नागेशवाडी, ब्रम्हवाडी ये., महाळंग्रावाडी, राचन्नावाडी, हाडोळी, टाकळगाव येथील सरपंचपद असल्याने तिथेही चुरशीच्या निवडणूका होणार आहेत. तसेच अजनसोंडा (बु), उजळंब, कडमुळी, केंद्रेवाडी, टाकळगाव शे, दापक्याळ, नागेशवाडी, शिवणखेड (बु.), शेळगाव येथील सरपंचपदाची धुरा महिलांच्या हाती राहणार आहे.
२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी तयारी सुरु आहे, अशी माहिती तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार एस.एस. टिपरसे यांनी दिली.