राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:14 IST2021-06-27T04:14:08+5:302021-06-27T04:14:08+5:30
शहरातील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, जयंती उत्सव समिती आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू ...

राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात
शहरातील महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, जयंती उत्सव समिती आणि क्रीडा विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. सहायक जिल्हाधिकारी जितीन रहेमान, प्राचार्य डॉ. सिद्राम डोंगरगे, उपप्राचार्य प्रा. मनोहर कबाडे, प्रा. बी. एम.जाधव, डॉ. श्रीकांत गायकवाड, डॉ. बाळासाहेब गोडबोले, कार्यक्रमाधिकारी डॉ. संजय गवई, डॉ. नल्ला भास्कर रेड्डी, प्रा. डी. आर.भुरे, पर्यवेक्षक प्रा. संजय पवार, प्रा. शिवशरण हावळे, टी. घनश्याम, गणेश शेटे, सुनील मांदळे, भीमाशंकर सुगरे, प्रा.आशिष क्षीरसागर यांची उपस्थिती होती. दयानंद विज्ञान महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, डॉ. मिलिंद माने, डॉ. कोमल गोमारे, प्रा. कुलकर्णी, संजय तिवारी, सुधीर तिवारी, विनोद घार, प्रदीप जावळे, विष्णू नाईकवाडे, किशोर जाधव, महेश आकनगिरे, अमोल क्षीरसागर, मोहसीन शेख आदींसह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
येथील राजमाता जिजामाता शैक्षणिक संकुलात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य डी. एन. केंद्रे, संस्थेच्या अध्यक्षा के. ए. जायेभाये, प्राचार्य संगमेश्वर केंद्रे, मदन धुमाळ, आर.डी. बिराजदार, सुधाकर लोकरे, सुनीता जवळे, अनुराधा पाटील, शोभा कांबळे, महेश मोटाडे, विवेक लोकरे, ए.बी. मुंडे, एस. एन. वाडीकर, आर.पी. मुंडे, परमेश्वर गित्ते आदींसह कर्मचारी उपस्थित होते.
लातूर शहरातील संगणकशास्त्र व माहितीतंत्रज्ञान महाविद्यालयात राजर्षी शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संस्थाध्यक्ष प्राचार्य डॉ.एम.आर. पाटील, प्राचार्य डॉ. एन.एस. झुल्पे यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी व्ही.व्ही. भोसले, उपप्राचार्य डी.आर. सोमवंशी, प्रा. कैलास जाधव यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.
मानवतेचे शिल्पकार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी
दयानंद कला महाविद्यालयाच्या वतीने शनिवारी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शिवाजी गायकवाड, उपप्राचार्य अनिलकुमार माळी, डॉ. शिवाजीराव जवळगेकर, डॉ. सुनील साळुंके, डॉ. अंजली जोशी, डॉ. रमेश पारवे, डॉ. सुनीता सांगोले, डॉ. प्रशांत मान्नीकर, डॉ. रामेश्वर खंदारे, डॉ. अशोक वाघमारे, प्रा. एस. बी. कुलकर्णी, डॉ. प्रशांत दीक्षित, प्रा. शांता कोटे, डॉ. संदिपान जगदाळे, डॉ. गोपाल बाहेती, प्रा. शैलेश सूर्यवंशी, नवनाथ भालेराव, डी.व्ही. ढोले यांची उपस्थिती होती.
शहरातील यशवंत विद्यालयात छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती साजरी करण्यात आली. मुख्याध्यापिका डॉ. सुवर्णा जाधव यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतीमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपमुख्याध्यापक शिवाजी जाधव, पर्यवेक्षक दयानंद कांबळे, महावीर काळे, डॉ. नरसिंग वाघमोडे आदींसह प्रशालेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.