शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लातूर मनपाला रेल्वेने दिले ९ कोटींचे बिल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 20:00 IST

लातूर शहरासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट समोर असताना २०१६ मध्ये केलेल्या पाणी पुरवठ्याचे ९ कोटी ९० लाखांचे बिल रेल्वेने पुन्हा २८ ऑगस्ट रोजी पाठविले आहे.

लातूर : लातूर शहरासमोर भीषण पाणीटंचाईचे संकट समोर असताना २०१६ मध्ये केलेल्या पाणी पुरवठ्याचे ९ कोटी ९० लाखांचे बिल रेल्वेने पुन्हा २८ ऑगस्ट रोजी पाठविले आहे. गेल्या तीन वर्षांपासून रेल्वेचा पाठपुरावा सुरू आहे. दरम्यान हे बिल राज्य शासनाने भरावे अथवा माफ करण्यात यावे, असा पत्रव्यवहार लातूर मनपा पुन्हा करणार आहे.

२०१६ मध्ये लातूर शहरात अभूतपूर्व पाणी टंचाई निर्माण झाली होती. या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी मिरजहून रेल्वेने पाणी पुरवठा करण्यात आला होता. ९ एप्रिल ते ९ ऑगस्ट २०१६ पर्यंत रेल्वेच्या १११ फेऱ्या झाल्या होत्या. प्रारंभीचे ५ दिवस ५ लाख लिटर पाणी आणले होते. त्यानंतर दररोज २५ लाख लिटर पाणी रेल्वेद्वारे मिरजहून आले होते. ९ एप्रिल ते ९ ऑगस्ट या पाच महिन्यात २५ कोटी ९५ लाख लिटरचा पाणी पुरवठा रेल्वेद्वारे लातूर शहराला झाला होता. त्याचे ९ कोटी ९० लाखांचे बिल भरावे, असे पत्र सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाने लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठविले आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित पत्रावर कारवाई करावी म्हणून मनपा प्रशासनाला हे पत्र पाठविले आहे. सध्या लातूर शहरात तीव्र पाणी टंचाईचे संकट आहे. २०१६ पेक्षा भीषण परिस्थिती समोर दिसत आहे. मांजरा प्रकल्पात ५.२५ दलघमी पाणीसाठा आहे. सप्टेंबर महिन्यात दोनच वेळा नळाद्वारे पाणी सुटणार आहे. परतीचा पाऊस नाही झाला तर टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचे नियोजन मनपा प्रशासन करीत आहे. त्यातच सोलापूर मध्य रेल्वे प्रशासनाने २०१६ चे बिल पाठविल्याने अडचणीत भर पडली आहे. 

 

यापूर्वीही केला पत्रव्यवहार; यंदाही भीषण टंचाई...

रेल्वेने पहिल्यांदाच बिल पाठविले आहे असे नाही. यापूर्वीही पत्रव्यवहार केलेला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली. या संदर्भात मनपा आयुक्त एम.डी. सिंह म्हणाले, सदर बिल शासनाने भरावे किंवा माफ करण्यात यावे, असा पत्रव्यवहार महापालिकेकडून झालेला आहे. दरम्यान, परतीचा पाऊस झाला नाही तर पुढच्याच महिन्यात ऑक्टोबरपासून २०१६ पेक्षा भीषण स्थिती आहे. लातूरवासीयांना नळाद्वारे सप्टेंबर महिन्यात दोनवेळाच पाणी मिळेल. त्यानंतर पाऊस न झाल्यास टँकर हाच पर्याय आहे. 

टॅग्स :laturलातूरWaterपाणीrailwayरेल्वे