शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
3
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
4
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
5
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
6
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
7
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
8
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
9
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
10
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
11
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
12
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
13
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
14
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
15
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
16
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
17
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
18
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
19
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
20
RR चे 'धुरंधर' चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात फसले! मग रिंकूचा फिनिशर अवतार दिसला अन् KKR अखेर जिंकले
Daily Top 2Weekly Top 5

लातूर ग्रामीण, औराद, गातेगाव हद्दीतील अवैध व्यवसायावर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:23 IST

पाेलिसांनी सांगितले, औराद शहाजानी, लातूर ग्रामीण आणि गातेगाव पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती पाेलिसांना ...

पाेलिसांनी सांगितले, औराद शहाजानी, लातूर ग्रामीण आणि गातेगाव पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत माेठ्या प्रमाणावर अवैध व्यवसाय सुरु असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पाेलीस पथकाने औराद शहाजानी परिसरातील तांबाळवाडी येथे छापा मारला. यावेळी सर्फराज ताजोदीन सय्यद, ३९ रा. तांबाळा ता. निलंगा, सय्यद हुसेन दाऊद सय्यद, ३१ रा. तांबळवाडी ता. निलंगा, कालिदास नरसिंग बिराजदार, ४८ रा. औराद शहाजानी ता. निलंगा हे स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन मटका जुगार चालवित हाेते. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख ७२ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर औराद शहाजानी ते बसवकल्याण रोडवर तांबरवाडी शिवारातच आणखी एका जुगारावर छापा मारण्यात आला. अभंग माणिक जमादार, ३८ रा. बसवकल्याण ता.जि. बीदर, इमरान इस्माईल सय्यद, २४ रा. तांबळवाडी ता. निलंगा, कालिदास नरसिंग बिराजदार, ४८ रा. औराद शहाजानी ता. निलंगा हे लाेकांकडून पैसे घेऊन कल्याण, मिलन-डे नावाचा मटका चालवित हाेते. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम असा एकूण ३२ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

गातेगाव परिसरातील मुरुड अकाेला शिवारात गावठी हातभट्टी चारचाकी वाहनातून घेवून जात असताना पाेलिसांनी छापा मारला. यावेळी यशवंत लालसिंग राठोड, ३० रा. तावरजखेडा जि.उस्मानाबाद, अच्युत सुभाष राठोड, २७ रा. आरणी जि. उस्मानाबाद, राजेभाऊ अनिल आडे, २० रा. जवळगावतांडा, ता. अंबाजोगाई जि. बीड हे हाती लागले. त्यांच्याकडून दाेन रबरी ट्यूबमधून ९० लिटर हातभट्टी आढळून आली. यावेळी कार आणि हातभट्टी जप्त करण्यात आली. तर लातूर ग्रामीण पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील सारोळा शिवारातील धर्मपाल चंद्रकांत अर्जून, ३८ रा. सुगाव ता. चाकूर हा माेटारसायकलवरुन देशी-विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले. यावेळी माेटारसायकलसह देशी-विदेशी दारू असा ७६,९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी लातूर ग्रामीण ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.