रबी पिके जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:29+5:302020-12-07T04:14:29+5:30

... प्रदूषण वाढले अहमदपूर : शहरातील काही गल्लीमध्ये कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे वराहाचा वावर वाढला आहे. हा कचरा ...

Rabi crops flourish | रबी पिके जोमात

रबी पिके जोमात

...

प्रदूषण वाढले

अहमदपूर : शहरातील काही गल्लीमध्ये कचऱ्याचे ढीग दिसत आहेत. त्यामुळे वराहाचा वावर वाढला आहे. हा कचरा सर्वत्र विखुरला जात असल्याने दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे काही नागरिक हा कचरा जाळत आहेत. परिणामी, हवेचे प्रदूषण वाढत आहे. संबंधितांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.

...

अनुदानाकडे लक्ष

पानगाव : परतीच्या पावसामुळे पानगाव परिसरातील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शासनाने पहिल्या टप्प्यात अनुदान उपलब्ध करुन दिले. मात्र दुसऱ्या टप्प्याचे अनुदान अद्यापही उपलब्ध झाले नसल्याने या भागातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे मदतीकडे लक्ष लागले आहे.

...

भाजीपाल्याचे दर घसरले

उदगीर : येथील बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांना लागवडीचा खर्चही मिळत नसल्याने चिंता व्यक्त होत असून शेतकऱ्यापुढे नवे संकट निर्माण झाले आहे.

...

मोर्चेबांधणी सुरू

चाकूर : ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने आणि प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्याने गावपातळीवरील नेतेमंडळींना निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यामुळे मोर्चेबांधणीस सुरुवात झाली आहे. इच्छुकांकडून भेटीगाठी सुरु झाल्या आहेत.

...

आवक घटली

औराद शहाजानी : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सीमावर्ती भागातून शेतीमालाची मोठ्या प्रमाणात आवक होते. परंतु, सध्या शेतकरी रबीच्या हंगामात व्यस्त असल्याने शेतीमालाची आवक काही प्रमाणात घटल्याचे पहावयास मिळत आहे.

...

Web Title: Rabi crops flourish

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.