लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर पहाटेपासून रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:20 IST2021-05-12T04:20:07+5:302021-05-12T04:20:07+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून ज्येष्ठांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, लसीकरणासंदर्भात जनजागृती झाल्याने एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत ...

Queues from early morning at the health center for vaccinations | लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर पहाटेपासून रांगा

लसीकरणासाठी आरोग्य केंद्रावर पहाटेपासून रांगा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून ज्येष्ठांच्या लसीकरणास सुरुवात करण्यात आली. दरम्यान, लसीकरणासंदर्भात जनजागृती झाल्याने एप्रिलपासून ज्येष्ठ नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. मंगळवारी येथील ग्रामीण रुग्णालयात १५० लसींचे डोस दिले जाणार असल्याची माहिती मिळाल्याने पहिला आणि दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या होत्या. अनेकांच्या चेहऱ्यास मास्कही नव्हता. लवकर लसीकरण व्हावे म्हणून गर्दी झाली होती. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सचा फज्जा उडाला होता. केंद्रावर सोयी-सुविधांचा अभाव असल्यामुळे नागरिकांची दमछाक होत आहे. आरोग्य विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे.

पिण्याच्या पाण्याची सोय नाही...

मे महिना सुरू असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. लसीकरणासाठी नागरिक पहाटेपासूनच रांगा लावून तासनतास रांगेत उभे होते. त्यांच्या पिण्याच्या पाण्याची तसेच रांगेत फिजिकल डिस्टन्स ठेवून बसण्यासाठी सोय करणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया ज्येष्ठांनी व्यक्त केल्या.

सोयी-सुविधा देणार...

येथील तालुका आरोग्य अधिकारी डॉ. पवार म्हणाले, लसीकरण केंद्रावर पिण्याच्या पाण्यासाठी जारची व्यवस्था करण्यात आली आहे. परंतु, लसीकरण केंद्रावर १५० डोस असताना ४०० ते ५०० नागरिक येत आहेत. त्यामुळे सोयी-सुविधा तोकड्या पडत आहेत. सोयी-सुविधांवर अधिक भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title: Queues from early morning at the health center for vaccinations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.