‘गगन भरारी’ आत्मचरित्राचे प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:29+5:302021-07-10T04:14:29+5:30
लातूर : खाडगाव रोड प्रकाश नगर येथील सरस्वती विद्यालयात बालविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकिसन गिरधारीलाल राठी यांच्या ‘गगन ...

‘गगन भरारी’ आत्मचरित्राचे प्रकाशन
लातूर : खाडगाव रोड प्रकाश नगर येथील सरस्वती विद्यालयात बालविकास शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रामकिसन गिरधारीलाल राठी यांच्या ‘गगन भरारी’ आत्मचरित्राचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव ॲड. एल. ई. भागवत होते. माजी शिक्षणाधिकारी ॲड. मधुकर गिरी, आदर्श शिक्षक जी. जी. कांबळे, संस्थेचे संचालक सी. के. साळुंके, मुख्याध्यापक के. एच. शेळके, बिराजदार, वाघमारे, कांबळे आदी यावेळी उपस्थित होते.
चिंचोली बल्लाळनाथ येथे शिबिर
लातूर : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत चिंचोली बल्लाळनाथ येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिरामध्ये ३०० महिलांनी सहभाग घेतला. संजय गांधी निराधार योजना समितीच्या सदस्य शीतल सुरवसे यांनी तपासणी करून घेतली. यावेळी सरपंच अनिताताई जोगदंड, उपसरपंच विश्वास कावळे, तंटामुक्ती अध्यक्ष राजकुमार सुरवसे, ‘उमेद’चे एस. एस. सातपुते, एस. पी. सरवदे, पी. एस. राठोड, ए. जी. देशमाने, व्ही. एम. क्षीरसागर, मुमताज, अत्तार, प्रीती नवले, आदी उपस्थित होते.