शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आरोपींना फाशी द्या! सरपंच देशमुख यांच्या कुटुंबियांच्या न्यायासाठी रेणापुरात आक्रोश मोर्चा

By संदीप शिंदे | Updated: December 27, 2024 17:03 IST

हजारो समाजबांधवांचा सहभाग; आरोपींना अटक करण्याची मागणी

रेणापूर : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात यावी तसेच घटनेतील सुत्रधारांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा या प्रमुख मागणीसाठी रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने तहसील कार्यालयावर शुक्रवार विराट आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात हजारो मराठा समाजबांधव सहभागी झाले होते. 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तात्काळ फाशी देऊन संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांना योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी सकल मराठा समाज रेणापूर तालुक्याच्या वतीने श्रीराम विद्यालय ते तहसील कार्यालयपर्यंत आक्रोश मोर्चा काढण्यात आला. दीड वाजता तहसील कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. सदरचे प्रकरण हे जलद गती न्यायालयात चालवून आरोपींना तात्काळ फाशी देण्यात यावी, संतोष देशमुख यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, या घटनेची नोंद करून घेण्यास टाळाटाळ करणारे व आरोपीस मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना बडतर्फ करावे, खुनप्रकरणात त्यांना सहआरोपी करावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच परभणी येथील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या प्रशासनावर कठोर कारवाई करावी अशा मागण्यांचे निवेदन संतोष देशमुख यांची कन्या वैभवी व मुलगा विराज यांच्या हस्ते तहसीलदार मंजुषा भगत यांना देण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पिंपळफाटा येथे चक्काजाम आंदोलन...सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी रेणापूर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने एकूण चार आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार १ जानेवारी रोजी रेणापूर-पिंपळ फाटा येथे चक्काजाम आंदोलन होणार आहे. शुक्रवारी मोर्चेकऱ्यांनी शासन व प्रशासनावर रोष व्यक्त करीत जोरदार घोषणा देण्यात आल्या. हत्याप्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली.

न्यायासाठी सदैव आमच्यासोबत राहा...संतोष देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख म्हणाली, मी रेणापूर तालुक्यातील वाला येथील नात आहे. आमच्या कुटुंबाच्या न्यायासाठी सदैव आमच्यासोबत राहा. आमच्या कुटुंबावर जशी वेळ आली तशी कोणावरही येऊ नये. माझ्या वडिलांनी कुटूंबापेक्षा समाजाकडे अधिक लक्ष दिले. त्यामुळे ग्रामपंचायतीचा पुरस्काराने गौरवही झाला. शासनाने आम्हा देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून द्यावा, आरोपींना लवकर अटक करावी, अशी मागणीही केली.

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणlaturलातूरagitationआंदोलन