टाळ, मृदंग, वीणा वाजवित केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:23 IST2021-07-14T04:23:27+5:302021-07-14T04:23:27+5:30

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आझाद चौकापर्यंत करण्यात आले. आंदोलनात ...

Protest against the policies of the Central Government by playing tal, mridang and veena | टाळ, मृदंग, वीणा वाजवित केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध

टाळ, मृदंग, वीणा वाजवित केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आझाद चौकापर्यंत करण्यात आले. आंदोलनात किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुरेश मुंडे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नीलेश देशमुख, युवक जिल्हा सरचिटणीस भागवत फुले, चेअरमन राजकुमार पाटील, सदाशिव मोरे, शहराध्यक्ष सलीमभाई तांबोळी, सेवा दलाचे तालुकाध्यक्ष धनंजय कोरे, सीताराम मोठेराव, गंगाधर केराळे, सेवा दलाचे शहराध्यक्ष बस्वराज ऊर्फ बाळू इरवाने, अनिल महालिंगे, सचिन चाकुरकर, शिवकुमार चांदसुरे, नूर पटेल, सूर्यकांत मनदुबले, बालाजी गंदगे, पुंडलिक पाटील, नागेश तत्तापुरे, सुनील शिंदे, गफुर मासुलदार, रणजित पाटील शेळगावकर, तौसिफ शेख, अविनाश गोलावार, शेख अझहर, वाजीद सौदागर, अझहर सौदागर, इम्रान शेख, शकील गुळवे, भारत राठोड, बालाजी मोठेराव, रवि नाईकवाडे, योगेश भोसले, दिनेश फुले, शंकर मोरे, मनोज सोमवंशी, अझर सय्यद, शेख अहमद, उबेद शेख आदी सहभागी झाले होते. पोलीस निरीक्षक सोपान सिरसाट यांनी बंदोबस्त ठेवला होता.

दरवाढ मागे घेण्यात यावी...

केंद्रातील सरकार हे शेतकरी विरोधी आहे. पेट्रोल, डिझेल, गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण आहेत. लॉकडाऊनमुळे हाताला काम नाही. त्यातच महागाईने उच्चांक गाठला आहे. सर्वसामान्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे. इंधन दरवाढ मागे घेण्यात यावी. महागाई कमी करावी, अशा मागण्यांसाठी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. कुंभकर्णाच्या झोपेचे सोंग घेणाऱ्या सरकारला जागे करण्यासाठी आंदोलन करीत असल्याचे तालुकाध्यक्ष विलासराव पाटील व शहराध्यक्ष पप्पूभाई शेख यांनी सांगितले.

Web Title: Protest against the policies of the Central Government by playing tal, mridang and veena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.