वाढीव क्रीडा गुणांसाठी प्रस्ताव सादर करावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:14 IST2021-06-17T04:14:54+5:302021-06-17T04:14:54+5:30
परदेश शिष्यवृत्ती अर्ज करण्यास मुदतवाढ लातूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत प्रतिवर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध ...

वाढीव क्रीडा गुणांसाठी प्रस्ताव सादर करावेत
परदेश शिष्यवृत्ती अर्ज करण्यास मुदतवाढ
लातूर : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत प्रतिवर्षी अनुसूचित जाती, नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते. अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील मुलां-मुलींना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रमाचे पीएच.डी. विशेष अध्ययन करण्यासाठी आर्थिक मदत देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. २०२१-२०२२ या शैक्षणिक वर्षाकरिता विद्यार्थ्यांकडून परदेश शिष्यवृत्तीसाठी अर्ज मागविण्यात येत असून अर्ज सादर करण्यास १८ जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या प्रवर्गातील पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी. साठी अद्ययावत ३०० च्या आतील परदेशातील शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश घेणाऱ्या ७५ विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती मंजूर करण्यात येणार आहे .विद्यार्थ्यांनी विहीत नमुन्यातील अर्ज शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरील रोजगार या लिंकवरुन डाऊनलोड करुन घ्यावा. योजनेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, परदेशातील शैक्षणिक संस्थेची शिक्षण फी, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहेत. एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू राहणार नाही. पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी ३५ वर्ष व पीएच.डी साठी ४० वर्ष कमाल वयोमर्यादा असेल. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी पात्र असतील. वार्षिक उत्पन्न ६ लाखापेक्षा जास्त नसावे. अधिक माहितीसाठी संकेतस्थळास भेट द्यावी. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी केले आहे.
लातूर शहरात पाच केंद्रावर लसीकरण
लातूर : लातूर शहर महानगरपालिकेमार्फत गुरुवारी शहरात पाच केंद्रावर लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.
४५ वर्षे पुढील वयोगटासाठी विलासराव देशमुख शासकीय विज्ञान संस्था, दयानंद कॉलेज बार्शी रोड, लातूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, विवेकानंद प्रा. विद्यामंदिर, शिवाजी शाळा प्रांगण लेबर कॉलनी व यशवंत शाळा प्रा.ना.केंद्र, साळे गल्ली येथे कोव्हॅक्सिन व कोविशिल्ड लस दिली जाणार आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना कोविशिल्ड लसीचा पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. पहिला डोस घेऊन ८४ दिवस पूर्ण झालेल्यांना दुसरा डोस देय राहील. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत लसीकरण मोहीम राबविली जाणार असल्याचे महापालिकेच्या उपायुक्तांनी सांगितले.