जातीय मानसिकतेतून बाहेर पडल्याशिवाय प्रगती अशक्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:14 IST2020-12-07T04:14:21+5:302020-12-07T04:14:21+5:30
येथील रघुकुल मंगल कार्यालयात रविवारी शिक्षक साहित्य संघातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी ...

जातीय मानसिकतेतून बाहेर पडल्याशिवाय प्रगती अशक्य
येथील रघुकुल मंगल कार्यालयात रविवारी शिक्षक साहित्य संघातर्फे आयोजित पुस्तक प्रकाशन समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके होते. यावेळी डी. बी. जगत्पुरिया, डॉ. जयद्रथ जाधव, डॉ. राजकुमार मस्के, ललिता सबनीस, डॉ. सुशीलप्रकाश चिमोरे, विलास सिंदगीकर, धनंजय गुडसूरकर, प्रा. माधव जाधव, लेखक प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर, अंबादास केदार आदींची उपस्थिती होती.
यावेळी प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांच्या आळ आणि काळ व अंबादास केदार यांच्या काक-या या कथासंग्रहाचे प्रकाशन डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. सबनीस म्हणाले, जात ही बाब आपल्या मनातून गेली पाहिजे. दोन्ही कथाकारांनी ग्रामीण भागातील अनुभव या कथासंग्रहातून प्रभावीपणे मांडले आहेत. यावेळी डॉ. राजकुमार मस्के यांनी या कथा म्हणजे वेदनेचा संयमित अविष्कार असल्याचे सांगितले. डॉ. जयद्रथ जाधव यांनी दोन्ही कथा संग्रहाचे विवेचन करत, कथा दमदार असल्याचे सांगितले.
अध्यक्षीय समारोपात तिरुके यांनी उदगीरच्या साहित्य संस्कृतीचा आढावा घेऊन या कथासंग्रहाने येथील साहित्य विश्वात भर घातल्याचे सांगितले. प्रास्ताविक प्रा. ज्ञानेश्वर हंडरगुळीकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गौरव जेवळीकर यांनी केले. आभार पुजा हंडरगुळीकर यांनी मानले.
शिक्षक साहित्य संघातर्फे गौरव...
शिक्षक साहित्य संघातर्फे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी कार्यगौरव पुरस्काराने या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, प्रा. डॉ. सुशीलप्रकाश चिमुरे, धनंजय गुडसूरकर यांचा तर विलास सिंदगीकर यांना राज्यस्तरीय गुरु गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
***