शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने साेडवाव्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:34 IST2020-12-13T04:34:22+5:302020-12-13T04:34:22+5:30
लातूर ग्रामीण मतदारसंघात विद्युत रोहित्र बिघाडाच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना, नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे ...

शेतकऱ्यांच्या समस्या तातडीने साेडवाव्यात
लातूर ग्रामीण मतदारसंघात विद्युत रोहित्र बिघाडाच्या घटना गेल्या काही दिवसांत वाढल्या आहेत. परिणामी, शेतकऱ्यांना, नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. विद्युत रोहित्र ताततीने बदलणे, दुरुस्तीचे काम हाती घेणे गरजेचे असते. मात्र, अनेकदा या कामासाठी विलंब होत आहे, अशा तक्रारी विविध गावातील शेतकऱ्यांनी आ. धीरज देशमुख यांच्याकडे केल्या हाेत्या. दरम्यान, याची दखल घेत आ. देशमुख यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तक्रारी साेडविण्याच्या सूचना केल्या आहेत. आ. देशमुख म्हणाले, आधी कोरोना आणि त्यानंतर अतिवृष्टीमुळे शेतकरीबांधव अडचणीत सापडले होते. या संकटावर मात करीत शेतकऱ्यांनी रबीचा पेरा केला आहे. सिंचनाच्या दृष्टीने आगामी काळ महत्वाचा आहे. सध्याला शेतकऱ्यांना विद्युत रोहित्र बिघाडाच्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. हे चित्र तातडीने बदलले गेले पाहिजे. यासाठी महावितरणचे आवश्यक ते संपर्क क्रमांक शेतकऱ्यांपर्यंत पोचवावेत. शेतकऱ्यांच्या समस्यांची सोडवणूक कमीत कमी वेळेत करावी. शेतकऱ्यांची अडवणूक होऊ नये, यासाठी महावितरणने कायम तत्पर असावे, कामात दिरंगाई होऊ नये, अशा सुचनाही त्यांनी केल्या आहेत.