अहमदपूर बसस्थानकास लागले समस्यांचे ‘ग्रहण’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST2021-02-10T04:19:50+5:302021-02-10T04:19:50+5:30

अहमदपूर तालुक्यातील वाडी-तांड्यासह जवळपास १२४ गावांचा दररोज बसस्थानकाशी संपर्क येताे. रत्नागिरी - नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६५ शहरातून ...

Problems 'eclipse' at Ahmedpur bus stand | अहमदपूर बसस्थानकास लागले समस्यांचे ‘ग्रहण’

अहमदपूर बसस्थानकास लागले समस्यांचे ‘ग्रहण’

अहमदपूर तालुक्यातील वाडी-तांड्यासह जवळपास १२४ गावांचा दररोज बसस्थानकाशी संपर्क येताे. रत्नागिरी - नागपूर हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६५ शहरातून जात आहे. परिणामी, माेठ्या प्रमाणावर दिवसभर वाहनांची वर्दळ असूून येथील बसस्थानकामध्ये सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांना याचा फटका बसत आहे. बसस्थानकाला पावसाळ्यामध्ये पूर्णत: गळती लागली आहे. प्रवाशांनी आपला जीव मुठीत धरुन थांबावे लागते. त्याचबराेबर मोकाट जनावरांचा वावरही परिसरात अलिकडे वाढला आहे. या माेकाट जनावरांचा मुक्काम बसस्थानकातच असल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बसस्थानकातील पंखे बंद असून, उन्हाळ्यामध्ये प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे. प्रवाशांना या अच्छतेला समाेरे जावे लागत आहे. अशा स्थितीत प्रवाशांना बसस्थानकात बसची वाट पाहत थांबावे लागत आहे. तर बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधाही उपलब्ध नाही. प्रवाशांसाठी करण्यात आलेली आसन व्यवस्था माेडकळीला आली आहे. आसन व्यवस्थेच्या फरशा निघाल्या आहेत. परिणामी, प्रवाशांची माेठ्या प्रमाणावर हेळसांड हाेत आहे.

बसस्थानक परिसर बनले कचऱ्याचे आगार...

अहमदपूर येथील नगरपालिकेच्या वतीने शाैचालयांची उभारणी करण्यात आली नाही. परिणामी, लघुशंकेसाठी अहमदपूर शहरात येणारे अनेक व्यक्ती बसस्थानक परिसराचा वापर लघुशंकेसाठी करत असल्याचे समाेर आले आहे. त्याचबराेबर बसस्थानकालगत असलेल्या छाेट्या-माेठ्या व्यापाऱ्यांकडून दुकानातील कचराही बसस्थानक परिसरात टाकला जात आहे. परिणामी, बसस्थानक परिसत कचऱ्याचे आगार झाले आहे.

कचऱ्याचे ढीग जाग्यावरच...

रस्त्यालगत व्यवसाय करणारे हातगाडेवाले बसस्थानक परिसरात कचरा टाकत आहेत. परिणामी, अहमदपूर नगर पालिकेला वारंवार सांगूनही हा कचरा उचलला जात नाही. त्याचबराेबर लघुशंकेसाठी अहमदपूर शहरात व्यवस्था नसल्याने हातगाडेवाले, व्यापारी आणि इतर नागरिक बसस्थानकाच्या खुल्या जागेचा लघुशंकेसाठी वापर करत आहेत. त्यामूळे बसस्थानक परिसरात दुर्गंधी पसरली आहे. शहरात नगरपालीकेने बाजारपेठेतील व्यावसायीकांसाठी स्वच्छतागृह बांधणे आवश्यक आहे.

- एस.जी. सोनवणे, आगार प्रमुख, अहमदपूर

भंगार बसेसने प्रवासी झाले त्रस्त...

ग्रामीण भागात दळणवळणासाठी, प्रवासासाठी महत्वपूर्ण असलेल्या बसच्या उत्पन्न वाढीसाठी महामंडळाकडून प्रवाशांना आकर्षित केले जात आहे. यासाठी विविध योजना राबविल्या जात आहेत. मात्र, भंगार बसेसमुळे प्रवासी एसटीकडे पाठ फिरवीत असल्याचे दिसून येत आहे. अनेक बसेसच्या खिडक्या, आसन व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे.याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

- रामानंद मुंड, प्रवासी

Web Title: Problems 'eclipse' at Ahmedpur bus stand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.