चाकूरच्या सीमा सुरक्षा दलातील समस्या लवकरच दूर करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2021 04:14 IST2021-06-29T04:14:37+5:302021-06-29T04:14:37+5:30
खा. शृंगारे यांनी सीमा सुरक्षा दलास भेट देऊन पाहणी केली. यावेळी केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे महानिदेशक प्रवीण राठोड उपस्थित ...

चाकूरच्या सीमा सुरक्षा दलातील समस्या लवकरच दूर करणार
खा. शृंगारे यांनी सीमा सुरक्षा दलास भेट देऊन पाहणी केली. यावेळी केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचे महानिदेशक प्रवीण राठोड उपस्थित होते. याप्रसंगी खा. शृंगारे यांनी प्रशिक्षण घेत असलेल्या जवानांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी महानिदेशक प्रवीण राठोड यांनी चाकूर ते सीमा सुरक्षा दलापर्यंतचा नवीन रस्ता व त्यांचे रुंदीकरण, कॅम्पसमध्ये पाण्यासाठी स्वतंत्र एक्स्प्रेस फिडरची व्यवस्था, बालकांसाठी खुली व्यायामशाळा, आरओ प्लान्ट उभारण्यात यावा, अशी मागणी केली.
यावेळी उपकांडन्ट कपिल चव्हाण, विनोद तांदळे, चेतन पाखले, राहुल खजुरिया, तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे, भाजप तालुकाध्यक्ष शिवाजीराव बैनगिरे, बाजार समितीचे उपसभापती अशोकराव चिंते, नगरसेवक ॲड. संतोष माने, सिध्देश्वर पवार, नितीन रेड्डी, वसंतराव डिगोळे, मधुकर मुंडे, श्रीमंतराव शेळके आदी उपस्थित होते. खा. शृंगारे यांनी येथील केंद्रीय विद्यालयास भेट देऊन विद्यालयाच्या नवीन इमारत बांधकामाची पाहणी केली.