तीन वर्षांपासूनचा गावचा प्रश्न सुटला काही मिनिटांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:24 IST2021-08-14T04:24:34+5:302021-08-14T04:24:34+5:30

आमदार बाबासाहेब पाटील यांनी तहसील कार्यालयात जनता दरबार भरविला होता. या वेळी नायब तहसीलदार बबिता आळंदे, जि.प. सदस्य ...

The problem of the village for three years was solved in a few minutes | तीन वर्षांपासूनचा गावचा प्रश्न सुटला काही मिनिटांत

तीन वर्षांपासूनचा गावचा प्रश्न सुटला काही मिनिटांत

आमदार बाबासाहेब पाटील यांनी तहसील कार्यालयात जनता दरबार भरविला होता. या वेळी नायब तहसीलदार बबिता आळंदे, जि.प. सदस्य माधव जाधव, नगरसेवक अभय मिरकले, चिलखा गावचे चेअरमन शिंदे, राम जायभाये, बालाजी काळे, गोविंद काळे, गोपाळ काळे आदींची उपस्थिती होती.

या वेळी सुनेगाव शेनी शेंद्री येथील नागरिकांच्या समस्या गोपीनाथ जायभाये यांनी मांडल्या. गावात अडीच ते तीन वर्षांपूर्वी आरओ प्लान्ट बसविण्यात आले आहे. परंतु, त्यातून गावाला शुद्ध पाणी मिळत नाही, असे सांगितले. तेव्हा आ. बाबासाहेब पाटील यांनी आरओ प्लान्ट बसविलेल्यांकडे चौकशी केली असता त्यांची भंबेरी उडाली. तत्काळ प्लान्ट दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या. तसेच या गावांतील विजेच्या अडचणी मार्गी लावण्यासाठी गाव पातळीवरून सरपंचांकडून माहिती घेण्यात आली. हा प्रश्न लवकरच निकाली काढण्याच्या सूचना केल्या.

Web Title: The problem of the village for three years was solved in a few minutes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.