हाळी हंडरगुळी येथील बसस्थानकातील समस्या कायम ‌‌!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:19 IST2021-02-10T04:19:32+5:302021-02-10T04:19:32+5:30

उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी हे बाजाराचे गाव असल्याने शेतकरी, व्यापारी व प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सत्तावीस वर्षांपूर्वी येथे ...

The problem at the bus stand at Hunderguli remains ‌‌! | हाळी हंडरगुळी येथील बसस्थानकातील समस्या कायम ‌‌!

हाळी हंडरगुळी येथील बसस्थानकातील समस्या कायम ‌‌!

उदगीर तालुक्यातील हाळी हंडरगुळी हे बाजाराचे गाव असल्याने शेतकरी, व्यापारी व प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून सत्तावीस वर्षांपूर्वी येथे बसस्थानक उभारण्यात आले. मात्र बसस्थानकात स्थापनेपासून अद्याप मुबलक प्रमाणात सुविधा नसल्याने प्रवासी वर्गांतून नाराजी व्यक्त होत आहे. बसस्थानक परिसरात डांबरीकरण नसल्याने गिट्टी उघडी पडली आहे. अनेक वेळा गिट्टीचे खडे उडून लागून नुकसान झाल्याचे बोलले जाते. उन्हाळ्यात व हिवाळ्यात स्थानकात गाडी आली की धुळीचे लोट निर्माण होतात तर पावसाळ्यात चिखलाचे डेरे तयार होतात. त्यातील पाणी प्रवाशांच्या अंगावर जाते.चालकांनाही गाडी चालविताना कमालीची कसरत करावी लागत आहे. बसस्थानक प्रवेशद्वारावरच कचरा, घाण व कोंबड्यांची पिसे टाकली जात असल्याने दुर्गंधी पसरत आहे. बसस्थानकात पिण्याच्या पाण्याची सोय नाही. पाण्याची टाकी असून नसल्यासारखी आहे. उपहारगृह तर काही वर्षांपासून कुलूपबंद आहे. स्वच्छतागृहाची अवस्था तर दयनीय झाली आहे. त्यामुळे उघड्यावरच प्रवासी लघुशंका करतात. स्थानक परिसराला काटेरी झुडपांनी वेढले आहे. या समस्यांमुळे प्रवासी रस्त्यावरच बसची वाट पाहतात. बसस्थानकातील समस्या दूर कराव्यात अशी मागणी होत आहे.

पाठपुरावा करु...

हाळी हंडरगुळी येथील बसस्थानकात नियंत्रक म्हणून मी अलीकडेच नव्याने कारभार हाती घेतला आहे. बसस्थानकातील समस्याबाबत वरिष्ठांना कळविले जाईल. प्रवाशांना सुविधा देण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे. याबाबत आपण स्वत: पाठपुरावा करणार असल्याचे वाहतूक नियंत्रक टी.जी.मसुरे म्हणाले.

Web Title: The problem at the bus stand at Hunderguli remains ‌‌!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.