खासगी कोचिंग क्लासेसला मर्यादित स्वरूपात परवानगी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:17 IST2021-01-15T04:17:01+5:302021-01-15T04:17:01+5:30
नियमित क्लासेस ऑनलाईन प्रणालीचा अवलंब करूनच घेण्यात यावेत. केवळ शंका निरसनासाठी मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आल्याचे या आदेशात म्हटले ...

खासगी कोचिंग क्लासेसला मर्यादित स्वरूपात परवानगी
नियमित क्लासेस ऑनलाईन प्रणालीचा अवलंब करूनच घेण्यात यावेत. केवळ शंका निरसनासाठी मर्यादित स्वरूपात परवानगी देण्यात आल्याचे या आदेशात म्हटले आहे. कोचिंग क्लास, रेमेडियल क्लासच्या ठिकाणी बैठक व्यवस्था शारीरिक अंतराचे पालन करून करावी. कोचिंग क्लासेसचे शिक्षक, स्टाफ, विद्यार्थी यांच्यासाठी फेसमास्कचा वापर अनिवार्य असेल. विनामास्क प्रवेश देण्यात येऊ नये. नियमित निर्जंतुकीकरण, वैयक्तिक स्वच्छता, प्रवेशद्वारावर हँडवॉश, सॅनिटायझरची व्यवस्था असावी. शंका निरसन वर्गामध्ये शारीरिक अंतर नियमांचे पालन करून वर्गामध्ये २५ विद्यार्थ्यांपेक्षा कमी विद्यार्थी असावेत. ४५ ते ६० मिनिटांचा वेळ असावा. कोणत्याही परिस्थितीत यापेक्षा वर्गाची वेळ, कालावधी वाढणार नाही, याची दक्षता घ्यावी, असेही या आदेशात म्हटले आहे.
पालकांचे संमतीपत्र आवश्यक
विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत पालकांची संमती घेऊनच कोचिंग क्लासेसमध्ये डाऊट सेशनसाठी बसण्याची परवानगी देण्यात यावी. सर्दी, ताप, खोकला इत्यादी लक्षणे असल्यास विद्यार्थ्यांना वर्गात प्रवेश देऊ नये. त्यांनी आवश्यक तपासणी घेऊन उपचार करण्याबाबत समुपदेशन करण्यात यावे. या आदेशाचे किंवा अटींचे उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आल्यास सदरील आदेश रद्द करून संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथरोग प्रतिबंधक कायदा, १८९७ अन्वये दिलेल्या तरतुदीनुसार भारतीय दंड संहिता, १८६० चे कलम, १८८ नुसार तसेच महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना नियम २०२० इत्यादीमधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.