शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

कैद्यांना निवडणूक लढता येते मात्र, मतदानाचा अधिकार नाही; जामिनावर, तडीपार आरोपींचे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2026 19:22 IST

गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींबाबत निवडणूक आयोगाचे नियम स्पष्ट आहेत.

लातूर : लोकशाहीच्या सर्वात मोठ्या उत्सवात मतदानाचा हक्क कोणाला आहे अन् कोणाला नाही, याबाबतचे काही कायदेशीर निकष आहेत. विशेषतः गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींबाबत निवडणूक आयोगाचे नियम स्पष्ट आहेत. कैद्यांना निवडणूक लढवता येते, मात्र मतदानाचा अधिकारी नाही.

तडीपार आरोपी अन् स्थानबद्धांसाठी नियम...ज्या आरोपींना विशिष्ट जिल्ह्यांतून तडीपार करण्यात आले आहे, त्यांना मतदानाच्या दिवशी दिलासा मिळतो. ज्या मतदान केंद्रावर त्यांचे नाव आहे, तिथे ठराविक कालमर्यादेत येऊन मतदान करण्याची मुभा त्यांना दिली जाते. मतदान प्रक्रिया पूर्ण होताच त्यांना तत्काळ जिल्हा सोडावा लागतो. दुसरीकडे, जे आरोपी स्थानबद्ध आहेत, त्यांना निवडणूक आयोगाच्या परवानगीने टपाली मतदानाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते.

कैद्यांबाबत काय सांगतो कायदा?लोकप्रतिनिधी कायदा, १९५१ च्या कलम ६२(५) नुसार, जे आरोपी प्रत्यक्ष तुरुंगात (शिक्षा भोगत असलेले किंवा कच्च्या कैद्यांच्या स्वरूपात) आहेत, त्यांना मतदानाचा अधिकार नाकारण्यात आला आहे. मात्र, यात एक मोठा विरोधाभास दिसून येतो.निवडणूक लढवता येते, पण मतदान करता येत नाही.

लातूर कारागृहामध्ये ४२५ बंदिवान संख्या...लातूर जिल्हा कारागृहाची क्षमता ५०० कैद्यांची आहे. सध्याला ४२५ कैदी आहेत. यामध्ये १९ महिला कैदी तर ४०६ पुरुष कैदी आहेत. यामध्ये ५० कैदी हे शिक्षा भाेगत आहेत.- बी.एन. मुलाणी, तुरुंग अधीक्षक, लातूर

‘जामिना’वर असेल तर करता येईल मतदान...भारतीय कायद्यानुसार, एखादी व्यक्ती तुरुंगात असतानाही निवडणूक लढवू शकते. (जोपर्यंत तिला दोन वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त काळ शिक्षा होऊन अपात्र ठरवले जात नाही). मात्र, तीच व्यक्ती तुरुंगात असताना स्वतःचे मत देऊ शकत नाही. हा नियम जामिनावर बाहेर असलेल्या आरोपींना लागू होत नाही; ते मतदान करू शकतात.

तर तुरुंगातील कैद्यांना मतदान करता येत नाही...पाेलिसांकडून तडीपार आणि स्थानबद्ध केलेल्या व्यक्ती लोकशाही प्रक्रियेत सहभागी होऊ शकतात. मात्र तुरुंगात असलेल्या कैद्यांसाठी मतदानाचा दरवाजा अद्याप बंद आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Prisoners can contest elections, but can't vote; what about bail?

Web Summary : In India, prisoners can fight elections but are barred from voting. Those on bail or externed can vote under certain conditions. Those under house arrest can vote by postal ballot.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६