प्राचार्य अजहर शेख यांना पीएच.डी. प्रदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:20 IST2021-07-26T04:20:03+5:302021-07-26T04:20:03+5:30

प्राचार्य अजहर शेख यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ॲनिमेशन ...

Principal Azhar Sheikh has a Ph.D. Provided | प्राचार्य अजहर शेख यांना पीएच.डी. प्रदान

प्राचार्य अजहर शेख यांना पीएच.डी. प्रदान

प्राचार्य अजहर शेख यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ॲनिमेशन चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी मांडला होता. शिवाय, इटेरिअर डिझायनिंग, बांधकाम सुपरवायझर, आर्किटेक्ट, कनिष्ठ महाविद्यालय, नाट्य, नृत्य व संगीत कला महाविद्यालय व आश्रमशाळा उभारून त्या माध्यमातून अनेकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली. व्यावसायिक शिक्षणात केलेल्या कामगिरीची दखल घेत त्यांना फ्रान्सच्या सॉरबन विद्यापीठाकडून पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. दिल्ली येथे आयोजित कार्यक्रमास कुलगुरू डॉ. जॉन थॉमस, डॉ. फेडरेट यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्या या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यवाह नितीन शेटे, मंगेश सोमाणी, प्रा. रघुनाथ कुलकर्णी, इंजि. किशोर कुलकर्णी, प्रा. चंद्रकांत मुळे आदींनी कौतुक केले.

Web Title: Principal Azhar Sheikh has a Ph.D. Provided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.