शहरं
Join us  
Trending Stories
1
कोयनानगर भूकंपाच्या धक्क्याने हादरले; रात्री १२ वाजून ९ मिनिटांनी जाणवला सौम्य धक्का
2
Trump Peace Deal: डोनाल्ड ट्रम्प यांनी गाझा-इस्रायलयचा नकाशा बदलला! सीमेवर कोणत्या गोष्टी बदलणार?
3
नेपाळ, इंडोनेशियानंतर आता 'या' देशात Gen Z तरूण रस्त्यावर उतरले; संघर्ष सुरू, दगडफेक अन्...
4
मोबाईल रिचार्जवर किती जीएसटी? कपात झाली का? पोस्टपेड, वायफायच्या इंडस्ट्रीवर काय परिणाम...
5
अहिंसेवर हिंसक हल्ला! लंडनमध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याची विटंबना; भारतानं केला तीव्र निषेध
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; मिळणार ३० दिवसांच्या पगाराइतका बोनस, सरकारची मोठी घोषणा
7
अपराजित भारताचा आशिया चषकात डंका! प्रतिस्पर्धी संघांना चारली धूळ
8
Aadhaar Card मध्ये बदल करायचाय तर आताच करुन घ्या, १ ॲाक्टोबरपासून वाढणार शुल्क, पाहा काय काय बदलणार?
9
दसरा मेळाव्यावरून भाजप, उद्धवसेनेत जुंपली; दसरा मेळावा रद्द करण्याच्या भाजपच्या मागणीवर उद्धवसेनेचा हल्लाबोल
10
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
11
भाजपाच्या वर्चस्वाला आव्हान, १० वर्षाचा विजयी रेकॉर्ड मोडला; कुणी लावला गडाला सुरूंग?
12
October 2025 Astro: ऑक्टोबर घेऊन येतोय दसरा दिवाळी, सोबतच 'या' राशींच्या भाग्याला झळाळी!
13
जिच्यामुळे बॉलिवूडमध्ये आली, तिलाच केलं अनफॉलो! फराह खान-दीपिकामध्ये नक्की काय बिनसलं?
14
आजचे राशीभविष्य, ३० सप्टेंबर २०२५: चालू कामात यश मिळेल, सामाजिक क्षेत्रात कीर्ती वाढेल
15
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
16
देवीच्या भंडाऱ्याला गेलेला तो चिमुकला पुन्हा परतलाच नाही; २० फूट नाल्यात पडल्याने १३ वर्षीय मुलाचा मृत्यू
17
सीबीडीत मसाज पार्लरच्या नावाखाली कुंटणखाना; वेगळ्या खोल्यांमधून सुरू होती देहविक्री
18
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
19
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
20
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?

लातुरात पिवळ्या ज्वारीचे भाव वाढले; गव्हाचे दर स्थिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 11:42 IST

बाजारगप्पा :  लातूर येथे पिवळ्या ज्वारीच्या सर्वसाधारण दरात २०० रुपयांनी वाढ झाली

- हरी मोकाशे (लातूर)

उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर येथे पिवळ्या ज्वारीच्या सर्वसाधारण दरात २०० रुपयांनी वाढ झाली असून, प्रतिक्विंटल ४५०० रुपयांपर्यंत भाव वाढले आहेत़ गव्हाचे दर मात्र स्थिर असून, सर्वसाधारण दर २५०० रुपये मिळत आहे़

येथील बाजार समितीत मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा येथून शेतमालाची आवक होते़ यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने खरिपातील शेतीमालाच्या उत्पादनात जवळपास ७० टक्क्यांनी घट झाली आहे़ साधारणत: उडीद, मुगाची विक्री दीपावलीच्या कालावधीत झाली़ काही सधन शेतकरी आणखी महिनाभराने चांगला भाव मिळेल, या आशेवर होते, त्यामुळे हे शेतकरी सध्या मूग, उडीद हा शेतमाल विक्रीसाठी आणत आहेत़ त्यांना काही प्रमाणात दरवाढही मिळत आहे; परंतु शासनाने जाहीर केलेल्या आधारभूत किमतीपेक्षा ८०० ते १८७५ रुपये कमी आहे़ सध्या मुगाची आवक ३७७ क्विंटल असून, सर्वसाधारण दर ५१०० रुपयांपर्यंत राहिला आहे, तसेच उडदाची आवक ४४३ क्विंटलअसून, ४८०० रुपये भाव मिळत आहे.

सीमावर्ती भागातून बाजरीची आवक वाढत आहे़ त्याचबरोबर कमाल दरातही शंभर रुपयांनी वाढ झाली असून, सर्वसाधारण दर १७५० रुपये मिळत आहे़ गव्हाची आवक आणि दरही स्थिर राहिला आहे़ २५०० रुपये सर्वसाधारण दर मिळत आहे़ रबी ज्वारीच्या दरात शंभर रुपयांनी वाढ होऊन २७०० रुपयांपर्यंत भाव पोहोचला आहे़ पिवळ्या ज्वारीची आवक निम्म्याने घटून १०६ क्विंटल अशी होत आहे़ कमाल दर ४७५० रुपये आहे़ सर्वसाधारण दरात वाढ होऊन सध्या ४५०० रुपये असा भाव मिळत आहे़ किमान दर स्थिर राहिला आहे़ 

जुन्या हरभऱ्याच्या दरात गत आठवड्याच्या तुलनेत २०० रुपयांची घसरण झाली आहे़ बाजारपेठेत १ हजार १८ क्विंटलआवक होत असून, कमाल दर ४६०० रुपये, तर सर्वसाधारण दर ४१२० रुपये मिळत आहे़ जिल्ह्यात सर्वाधिक उत्पादन घेतले जाणाऱ्या  सोयाबीनची आवक स्थिर असून, सध्या १७ हजार ९५८ क्विंटलआवक होत आहे़ कमाल दर ३३९३ रुपये मिळत असून, सर्वसाधारण दर ३३२० रुपये मिळत आहे़ गत आठवड्याच्या तुलनेत या दरात अल्पशी घट झाली आहे़ मागील आठवड्यात सर्वसाधारण दर हमीभावापेक्षा अधिक पोहोचला होता.

सध्या बाजारपेठेत मका- १५००, तूर- ४७६०, करडई- ४२००, तीळ- ११५०० आणि गुळाला २४०० रुपये प्रतिक्विंटलसर्वसाधारण भाव मिळत आहे़ पशुधनासाठीचा हिरवा चारा, कडब्याच्या दरात वाढ झाली असून, ३९ रुपयांना पेंढी मिळत आहे़ आवकही घटली आहे़ सध्या बाजारपेठेत ज्वारी, गहू, मका अशा शेतमालाचा दर्जा कमी असल्याने त्यास मागणी कमी आहे़ परिणामी, दर स्थिर राहत आहेत़ हंगामाच्या कालावधीत पाऊसच नसल्याने शेती पिकावर परिणाम झाला आहे़ त्यामुळे बाजार समितीतील व्यवहार कमी होऊन आर्थिक उलाढाल मंदावली आहे.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMarket Yardमार्केट यार्ड