कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंध हा महत्त्वाचा उपाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:15 IST2021-06-05T04:15:14+5:302021-06-05T04:15:14+5:30
मराठी विज्ञान परिषद, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय व श्री हावगीस्वामी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड १९ महामारी जनजागरण अभियान ...

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंध हा महत्त्वाचा उपाय
मराठी विज्ञान परिषद, धन्वंतरी आयुर्वेदिक महाविद्यालय व श्री हावगीस्वामी महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोविड १९ महामारी जनजागरण अभियान सप्ताहांतर्गत कोविड प्रतिबंध या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नांदेडच्या शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. यशवंत पाटील होते. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत कापसे, श्री हावगीस्वामी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. आप्पाराव काळगापुरे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. नागोबा म्हणाले, मानसिकदृष्ट्या खंबीर असल्यास कोरोनासारख्या आजारावर सहजरीत्या मात करता येते. मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, फिजिकल डिस्टन्स राखणे हेच चांगले उपाय आहेत. जगाच्या तुलनेत भारतात कोरोनामुळे होणारे मृत्यूचे प्रमाण कमी असून प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी लसीकरण आवश्यक आहे. देशात कोरोनाच्या भीतीमुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. सध्या आपणास कोरोनाची लागण होणार नाही, यासंदर्भात जेवढी काळजी घेता येईल तेवढी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रास्ताविक प्रा. डॉ. राहुल आलापुरे, सूत्रसंचालन डॉ. विठ्ठल गोरे यांनी केले. परिचय डॉ. दत्ता पाटील यांनी करून दिला. आभार डॉ. पी. एम. देवशेट्टे यांनी मानले.