‘आयएमए’च्या अध्यक्षपदी डॉ. बाळासाहेब पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:54+5:302021-07-10T04:14:54+5:30
उदगीर : इंडियन मेडिकल असोसिएशन, उदगीरच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी डॉ. बाळासाहेब पाटील तर सचिवपदी डॉ. ...

‘आयएमए’च्या अध्यक्षपदी डॉ. बाळासाहेब पाटील
उदगीर : इंडियन मेडिकल असोसिएशन, उदगीरच्या नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. अध्यक्षपदी डॉ. बाळासाहेब पाटील तर सचिवपदी डॉ. महेश जाधव यांची निवड करण्यात आली.
उदगीर तालुक्यातील एमबीबीएस, डिप्लोमा, एम. डी., एम. एस. अशा सर्व वैद्यकीय व्यावसायिकांची बैठक पार पडली. त्यात ही निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी डाॅ. तानाजी मोरे, डाॅ. नितीन गुरुडे, कोषाध्यक्षपदी डाॅ. संगमेश्वर दाचावार, सहसचिवपदी डाॅ. अत्तार जावेद, डाॅ. यशोधन सताळकर, डॉ. नवनाथ सोनाळे, महिला प्रतिनिधीपदी डॉ. सविता पदातुरे, डाॅ. ज्योती सोमवंशी, इव्हेंट इन्चार्ज डाॅ. प्रवीण मुंदडा, डाॅ. प्रशांत माने, डाॅ. श्रीकांत शेळकीकर, बुलेटिन इन्चार्ज डाॅ. संजय चिल्लरगे यांची निवड करण्यात आली.
नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन डाॅ. दत्तात्रय पवार, डाॅ. माधव चंबुले, डाॅ. संजय कुलकर्णी, डॉ. संतोष पांचाळ, डाॅ. विजय केंद्रे, डाॅ. शशिकांत देशपांडे, डाॅ. मनोहर सूर्यवंशी, डाॅ. मन्मथ देलमाडे, डाॅ. व्यंकटेश मलगे, डाॅ. प्रदीप जटाळे आदींनी केले.