पावसाच्या हजेरीमुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:24 IST2021-08-27T04:24:07+5:302021-08-27T04:24:07+5:30
पावसामुळे तालुक्यातील पूर्वेला असलेल्या गावांतील साठवण तलावात चांगला जलसाठा होऊन ते ओव्हरफ्लो झाले आहेत. हळद वाढवणा व रावणकोळा येथील ...

पावसाच्या हजेरीमुळे खरीप हंगामातील पिकांना जीवदान
पावसामुळे तालुक्यातील पूर्वेला असलेल्या गावांतील साठवण तलावात चांगला जलसाठा होऊन ते ओव्हरफ्लो झाले आहेत. हळद वाढवणा व रावणकोळा येथील तलावात जलसाठा वाढला असून ते भरून वाहत आहेत. मात्र, जगळपूर, हावरगा, येलदरा, सय्यदपूर, चेरा या गावात अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. बुधवारच्या पावसामुळे ढोरसांगवी तलावात काही प्रमाणात जलसाठा वाढला आहे.
जळकोट महसूल मंडळात एकूण ६९८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. घोणसी मंडळात ५४८ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. तालुक्यात ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत ७०० मिमीपर्यंत पाऊस झाल्याने जवळपास वार्षिक सरासरीच्या जवळपास पाऊस झाला आहे. आणखीन पावसाळ्याचा सप्टेंबर महिना शिल्लक आहे. त्या कालावधीत पाऊस झाल्यास तालुक्यातील बारा साठवण तलावात जलसाठा वाढून रब्बी हंगामासाठी त्याचा उपयोग होणार आहे.
यंदा पावसाने दीर्घ विश्रांतीनंतर हजेरी लावल्याने मूग, उडीद, सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होण्याची भीती आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. २५ दिवसानंतर आठवडाभरापासून पावसाची कमी-अधिक प्रमाणात हजेरी असल्याने सोयाबीन, ज्वारी, कापूस, तूर, सूर्यफुल आदी पिकांना जीवदान मिळाले आहे.