जळकोटात खरीप हंगामाची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:33+5:302021-05-27T04:21:33+5:30
जळकोट तालुक्यात केवळ खरीप हंगाम घेतला जातो. कारण तालुक्यातील बहुतांशी जमीनही डोंगराळ आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून ...

जळकोटात खरीप हंगामाची तयारी
जळकोट तालुक्यात केवळ खरीप हंगाम घेतला जातो. कारण तालुक्यातील बहुतांशी जमीनही डोंगराळ आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांचा मुख्य व्यवसाय शेती असून सोयाबीन, तूर, हायब्रीड, कापूस या पिकांचे उत्पादन घेतले जाते. तालुक्यात एकूण ३४ हजार हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी २५ हजार हेक्टर पेरणी योग्य आहे. सध्या कोरोनाच्या संकटामुळे आणि खरीप हंगाम जवळ आल्याने शेतकरी घरी न थांबता शेतीकामांमध्ये व्यस्त असल्याचे दिसत आहे. शेतात सेंद्रीय खत टाकणे, नांगरणी, काडी कसपट वेचणे, तुराट्या वेचणी, नाला, बंधाऱ्यांची दुरुस्ती अशी कामे आटोपत आहेत.
दरम्यान, ज्या शेतकऱ्यांची हंगामपूर्व कामे पूर्ण झाली आहेत, ते शेतकरी बी- बियाणे, औषधांची जुळवाजुळव करत आहेत. सध्या बियाणे आणि खतांचे दर वाढल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट निर्माण झाले आहे. रासायनिक खतांच्या किमती कमी कराव्यात. शेतकऱ्यांना बी-बियाणे मोफत देण्यात यावे. गत खरीप हंगामाचा पीक विमा त्वरित वाटप करावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.