दिव्यांगांना लस देण्यासाठी प्राधान्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:16 IST2021-06-02T04:16:31+5:302021-06-02T04:16:31+5:30
४ हजार १०८ दिव्यांगांची नोंद जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ४ हजार १०८ दिव्यांगांची नोंद झाली आहे. २ जूनपर्यंत या दिव्यांगांना ...

दिव्यांगांना लस देण्यासाठी प्राधान्य
४ हजार १०८ दिव्यांगांची नोंद
जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये ४ हजार १०८ दिव्यांगांची नोंद झाली आहे. २ जूनपर्यंत या दिव्यांगांना लस देण्याची विशेष मोहीम आरोग्य विभागाकडून राबविली जात आहे. दिव्यांगांचे लसीकरण वेगाने व्हावे म्हणून ही मोहीम राबविली जात आहे. दिव्यांगांचे लसीकरण तत्काळ होणारा महाराष्ट्रातील पहिला जिल्हा आहे.
समन्वयासाठी पथकाची नियुक्ती
दिव्यांगांचे लसीकरण सुलभ पद्धतीने व्हावे, यासाठी समन्वय पथक नियुक्त करण्यात आले आहे. समाजकल्याण विभागाकडून सदर पथक नियुक्त करण्यात आले असून, प्रत्येकी २० लाभार्थ्यामागे एका कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे लसीकरण करणे सुलभ होत आहे. ग्रामीण रुग्णालयातही दिव्यांग व्यक्तींसाठी खास कक्ष स्थापन करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनीही सर्व दिव्यांगांनी मोहिमेचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले आहे.
अडचण आल्यास हेल्पलाईनवर संपर्क
दिव्यांगांना लस घेण्यासंदर्भात कोणतीही अडचण आल्यास ०२३८२- २२३००२, ९०२१९१७५६८, ८६६८३४६७९२, ८३२९७३१८२९ या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन समाजकल्याण अधिकारी, जिल्हा आरोग्याधिकाऱ्यांनी केले आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी गटविकास अधिकारी, तालुका आरोग्याधिकारी तसेच आरोग्य कर्मचारी परिश्रम घेत आहेत.