प्रताप खाडप यांचा लातुरात सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST2020-12-08T04:16:47+5:302020-12-08T04:16:47+5:30
राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे अभिवादन लातूर : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघ लातूरच्या वतीने अभिवादन ...

प्रताप खाडप यांचा लातुरात सत्कार
राष्ट्रीय चर्मकार महासंघातर्फे अभिवादन
लातूर : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय चर्मकार महासंघ लातूरच्या वतीने अभिवादन करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष बिभीषण सांगवीकर, माजी जिल्हाध्यक्ष अनिल कबाडे, सचिव प्रवीणअण्णा नाबदे आदींसह राष्ट्रीय चर्मकार महासंघ लातूर शाखेच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. महासंघाच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले.
श्री केशवराज विद्यालयात योग शिबीर
लातूर : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त श्री केशवराज विद्यालयात अभिवादन करण्यात आले. तसेच योग शिबिराचे आयोजन केले होते. यावेळी ॲड. दीपक कुलकर्णी, प्रदीप कटके, भास्करराव होळीकर, जगन्नाथ चिताडे, संजय विभुते, करुणा गायकवाड, संदीप देशमुख, बालासाहेब केंद्रे, दीपाली मुचाटे, शिवशंकर राऊत आदींसह शिक्षकांची उपस्थिती होती.
राहुल डोंबे यांचे यश
लातूर : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या नेट परीक्षेत प्रा. डाॅ. राहुल डोंबे यांनी यश मिळविले आहे. या यशाबद्दल महादेव डोंबे, मनोज कापरे, नागेश जाधव, भाऊसाहेब पुरी, डाॅ. रोहित गायकवाड, अभज धाराशिव, दत्ता करंडे, धनराज पवार, केतन मगर, सूरज सोनकांबळे, तुकाराम कांबळे, धम्मपाल कांबळे यांनी कौतुक केले.
रक्तदान शिबीर
लातूर : भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने अभिवादन करण्यात आले. तसेच रक्तदान शिबीर घेण्यात आले. यावेळी मच्छिंद्र गुरमे, विश्वनाथ जाधव, मधुकरराव कुलकर्णी, किशोर पवार यांनी रक्तदानामध्ये सहभाग नोंदविला. त्यांना ब्लड बँकेच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात आले.
वीरशैव महासभेतर्फे आ. पाटील यांचा सत्कार
लातूर : अखिल भारतीय वीरशैव महासभा बंगलोर जिल्हा शाखा लातूरच्या वतीने अहमदपूरचे आ. बाबासाहेब पाटील यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वीरशैव महासभेचे जिल्हाध्यक्ष शिवराज शेटकार, ॲड. वीरनाथ कोरे, दिलीप शास्त्री, ॲड. बाळासाहेब बेंडकुळे यांची उपस्थिती होती.
हरभरा पीक बहरले
लातूर : जिल्ह्यात रबी हंगामाच्या १३२ टक्के पेरण्या झाल्या आहेत. सर्वाधिक २ लाख ४८ हजार हेक्टर्सवर हरभऱ्याचा पेरा झाला असून,शेतशिवारात पीक बहरले आहे. लातूर, औसा, रेणापूर, उदगीर, जळकोट, निलंगा, शिरूर अनंतपाळ, देवणी आदी तालुक्यांत रबी हंगामाच्या पेरण्या पूर्ण होत आल्या आहेत. हरभऱ्यावरील फवारणीबाबत कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले जात आहे.
ग्रंथालयात अभिवादन
लातूर : शहरातील श्री गुरुगणेश ग्रंथालयात भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी पुखराज दर्डा, तेजमल बोरा, प्रकाशचंद सेठिया, राजेश डुंगरवाल, विनोद छाजेड, शांतीसेठ कुचेरिया, नरेंद्र गटागट, सतीश बोरा, सुनील गिरी, सुप्रिया कंदले, ऋषिकेश चापोलीकर आदींची उपस्थिती होती. यावेळी ग्रंथपाल सुनील गिरी यांचा एम. लिब. उत्तीर्ण झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.