दुर्दैवी! सोयाबीन काढताना वीज काेसळली; दाेघा मजुरांचा मृत्यू

By राजकुमार जोंधळे | Updated: October 21, 2022 23:15 IST2022-10-21T23:15:00+5:302022-10-21T23:15:12+5:30

कमलनगर तालुक्यातील मुधोळ (बी) येथील शिवारात सोयाबीन काढणी करणाऱ्या मजुरावर वीज कोसळून दोघे ठार झाले असून, एक गंभीर आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.

Power went out while harvesting soybeans Two laborers died | दुर्दैवी! सोयाबीन काढताना वीज काेसळली; दाेघा मजुरांचा मृत्यू

दुर्दैवी! सोयाबीन काढताना वीज काेसळली; दाेघा मजुरांचा मृत्यू

औराद बाऱ्हाळी (जि. बिदर) :

कमलनगर तालुक्यातील मुधोळ (बी) येथील शिवारात सोयाबीन काढणी करणाऱ्या मजुरावर वीज कोसळून दोघे ठार झाले असून, एक गंभीर आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी घडली आहे.

बिदर जिल्ह्यातील चिमेगाव (ता. कमलनगर) येथील २० मजूर वाहनाने सोयाबीन काढण्यासाठी मुधोळ (के) येथील विनायक रामराव बिरादार यांच्या शेतात शुक्रवारी सकाळी आले होते. दरम्यान, सोयाबीन काढून बनीम घालत असताना दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास अचानक मेघगर्जनेसह पावसाला प्रारंभ झाला. शिवाय, विजांचा कडकडाट सुरू झाला. कचराबाई केरबा तोडगीरे (वय ३५, रा. चिमेगाव) या महिलेच्या अंगावार वीज कोसळल्याने तिचा जागीच मृत्यू झाला, तर तिचा चुलत भाऊ किशन विठ्ठलराव विद्यावंत (२८, रा. चिमेगाव ) यास उपचारासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. 

अर्चना दीपक रेकाटे (३०, रा. चिमेगाव) या जवळपास ५० टक्के भाजल्या आहेत. त्यांना औरादा (बाऱ्हाळी) येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Power went out while harvesting soybeans Two laborers died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :laturलातूर