हाळी हंडरगुळी येथे सत्ता परिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:22 IST2021-01-19T04:22:06+5:302021-01-19T04:22:06+5:30
१५ सदस्य असलेली हाळी ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे चुरस होती. यापूर्वी हाळी ग्रामपंचायतीत शिवाजीराव माने यांची सत्ता ...

हाळी हंडरगुळी येथे सत्ता परिवर्तन
१५ सदस्य असलेली हाळी ग्रामपंचायत राजकीयदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे चुरस होती. यापूर्वी हाळी ग्रामपंचायतीत शिवाजीराव माने यांची सत्ता होती. मात्र, विकासकामांच्या मुद्द्यांवरून यंदा येथे सत्ता परिवर्तन झाले. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कल्याण पाटील यांनी १५पैकी ९ जागा जिंकून ग्रामपंचायतींवर वर्चस्व निर्माण केले. यात राजकुमार पाटील, मिरा शाहीर, हमिलाबी बेग, आण्णाराव मसुरे, संगीता बच्चेवार, मथुरा कांबळे, माधव धानुरे, माया गायकवाड, सुकेशनी कांबळे, उपेंद्र काळेगोरे, सुदर्शन माने, खाजामैनोद्दीन शेख, सिद्धू मसुरे, मुमताजबी डांगे, सुरेखा शिंदे हे विजयी झाले आहेत.
१५ सदस्य असलेली हंडरगुळी ग्रामपंचायत ही व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची मानली जाते. १० वर्षांपासून हंडरगुळी ग्रामपंचायतीवर अशोक धुप्पे यांची एकहाती सत्ता होती. मात्र, या निवडणुकीत बालाजी भोसले यांनी त्यांच्या वर्चस्वाला हादरा दिला. १५पैकी १२ जागा बालाजी पाटील यांनी जिकल्या आहेत. विजयी उमेदवारात बालाजी भोसले पाटील, नागोराव चिमनदरे, राशेदबी चौधरी, फलेताबी शेख, ज्ञानेश्वर पिट्टलवाड, विजयकुमार अंबेकर, कुसुम दापके, राजाबाई कांबळे, अंकुश अनलदास, सुनील कांबळे, उर्मिला कांबळे, भाग्यश्री उडतेवार, दैवशाला धुप्पे, ओमकार काळवणे, जयाबाई सुळे यांचा समावेश आहे.