Pornography threatens to go viral; Police custody for the accused | अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी; आरोपींना पोलीस कोठडी
अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी; आरोपींना पोलीस कोठडी

अहमदपूर (जि.लातूर) : अश्लील चित्रफीत व्हायरल करण्याची धमकी देऊन एका शिक्षकाला २० लाखांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणात अटकेत असलेल्या एका महिलेसह राजू किशन जाधव या दोन्ही आरोपींना अहमदपूर येथील न्यायाधीश वृंदा भोसले यांनी बुधवारी सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. 

सदर प्रकरणात पीडित शिक्षकाच्या नातेवाईकाने अहमदपूर पोलिसात फिर्याद दिली होती. त्यावरून आरोपी राजू जाधव (रा. तिपण्णा नगर, अहमदपूर) व महिला आरोपीस पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी गजाआड केले होते.  या प्रकरणाचा अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम, पोलीस उपनिरीक्षक अनासपुरे, पोहेकॉ. सुहास बेंबडे, सुनील श्रीरामे, रियाज देशमुख, परमेश्वर वागतकर करीत आहेत.

तक्रारकर्त्यांची नावे गोपनीय राहतील... 
या प्रकरणात अन्य कोणाची लुबाडणूक झाली आहे का, याचा तपास पोलीस करीत असून, पीडितांनी तक्रारी कराव्यात, त्यांची नावे गोपनीय ठेवली जातील, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेलार यांनी केले आहे. 

Web Title: Pornography threatens to go viral; Police custody for the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.