नवीन रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाका रस्त्याची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:14 IST2021-07-10T04:14:33+5:302021-07-10T04:14:33+5:30
लातूर : शहराची कनेक्टिव्हिटी असलेल्या नवीन रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाका या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ...

नवीन रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाका रस्त्याची दुरवस्था
लातूर : शहराची कनेक्टिव्हिटी असलेल्या नवीन रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाका या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. राजीव गांधी चौक ते नवीन नांदेड नाका, नवीन रेणापूर नाका ते राजीव गांधी चौक हे शहरालगतचे रिंग रोड सर्व बाजूंनी राष्ट्रीय महामार्गांनी जोडले गेले. नवीन रेणापूर नाका ते नवीन नांदेड नाका या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. प्रवाशांना कसरत करत या रस्त्यावरून जावे लागते. या मार्गावर नेहमीच वर्दळ आहे. लातुरातून साठ फूट मार्गाने येणाऱ्या वाहनांना याच मार्गाने येणे-जाणे करावे लागत आहे. शिवाय नवीन मॉल्स, दुकाने या परिसरात आहेत. त्यामुळे कायम वर्दळ असते. परंतु, रस्ता खराब असल्याने गैरसोय होत आहे. गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे खड्ड्यांमध्ये पाणी साचले आहे. रस्त्याची दुरुस्ती व्हावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे.