जळकोट-दापका रस्त्याची दुरवस्था, डांबरीकरण करण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:21 IST2021-05-27T04:21:29+5:302021-05-27T04:21:29+5:30
काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या जळकोट ते दापका राजा या रस्त्याचे डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून ...

जळकोट-दापका रस्त्याची दुरवस्था, डांबरीकरण करण्याची मागणी
काही वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या जळकोट ते दापका राजा या रस्त्याचे डांबरीकरण उखडून मोठमोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्यावरून वाहन चालविणे कठीण झाले आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. मागील काही वर्षांत पाऊस आणि अतिवृष्टी झाल्याने रस्ता वाहतुकीसाठी योग्य राहिला नाही. लातूर व नांदेड या दोन्ही जिल्ह्यांच्या प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे. येत्या महिनाभरात या मार्गाचे डांबरीकरण करावे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या जळकोट तालुका शाखेने केली आहे. या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले आहे. निवेदनावर तालुकाध्यक्ष अजीज मोमीन, बळिराम नामवाड, पहिम बागवान, खुद्दुस मोमीन, सलीम बागवान, बालाजी राचेलवार, खलील मोमीन, अब्दुल बागवान, सुभाष बनसोडे, उस्मान बागवान, बस्वराज सोप्पा, दत्तात्रय वाघमारे, अशोक कळसे, गणपत गंगोत्री यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.