मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांनी केली कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:15 IST2021-07-01T04:15:14+5:302021-07-01T04:15:14+5:30
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. दुपारी ४ वा. पर्यंत व्यवहार सुरू आहेत. दरम्यान, प्रत्येकाने मास्कचा वापर ...

मास्क न वापरणाऱ्यांवर पोलिसांनी केली कारवाई
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. दुपारी ४ वा. पर्यंत व्यवहार सुरू आहेत. दरम्यान, प्रत्येकाने मास्कचा वापर करावा, अशा सूचना करण्यात येत आहेत. मात्र, काही नागरिक घराबाहेर पडताना मास्क वापर नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस, पालिका, तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालयाने वारंवार जनजागृती केली आहे. परंतु, काही जण मास्कचा वापर करीत नसल्याचे निदर्शनास येताच बुधवारी पोलीस, पालिकेच्या अधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात थांबून रस्त्यावरून ये- जा करणा-यांना तसेच दुचाकीवरील वाहनधारकास मास्क लावण्याची सक्ती केली. मास्क नसलेल्या बहुतांश दुचाकीस्वारांना दंडही आकारला. यावेळी ४७ दुचाकीस्वारांकडून प्रत्येकी शंभर रुपयांप्रमाणे ४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. यावेळी पालिकेचे अधिकारी कांबळे, प्रशांत गायकवाड, अक्षय कांबळे यांनी ही कारवाई केली.