जिगरबाज पोलिसाने वाचविले पुरात अडकलेल्या दोघांचे प्राण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 16, 2020 01:47 PM2020-10-16T13:47:55+5:302020-10-16T13:48:15+5:30

Flood Rescue पोलीस नाईकांनी केलेल्या मदतीला नागरिकांनी सलाम केला. 

Police rescued two from flood at Nilanga | जिगरबाज पोलिसाने वाचविले पुरात अडकलेल्या दोघांचे प्राण

जिगरबाज पोलिसाने वाचविले पुरात अडकलेल्या दोघांचे प्राण

Next
ठळक मुद्देनिलंगा तालुक्यातील घटना

औराद शहाजानी (जि़ लातूर) : निलंगा तालुक्यातील नेलवाड शिवारात पुलावरून रस्ता ओलांडत असताना पाण्यात पडलेल्या दोघांना एका पोलीस कर्मचाऱ्याने स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचिवाल्याची घटना बुधवारी घडली़ कर्तव्यावर असलेल्या पोलीस नाईकांनी केलेल्या मदतीला नागरिकांनी सलाम केला. 

निलंगा तालुक्यातील नद्यासह सर्व तलाव भरुन वाहत आहेत़ कासार सिरसी पोलिस स्टेशनशमध्ये पोलिस नाईक पदावर कार्यरत असलेले  मन्मथ धुमाळ  हे  मंगळवारी नेलवाड येथे तलावालगतच्या लहान पुलावर कर्तव्यावर होते़  दरम्यान, बुधवारी दुपारी ३़३० वाजण्याच्या वेळेस बस्वकल्याणकडून  एक टेम्पो आला़ यातून शिवाजी गायकवाड व त्यांच्या सोबत २५ वर्षाचा  तरुण टेम्पोतून उतरून पाण्यातून नेलवाड गावाकडे जात होते. यावेळी कर्तव्यावर असलेले पोना़ धुमाळ यांनी त्या दोघांना पाहिले, यावेळी नागरिकांची ओरडही सुरू होती़ बघता बघता ते दोघेही ओढ्याच्या प्रवाहात जवळपास २० फुट अंतरावर एका झाडाला अडकले़ हे पाहून पोना़ धुमाळ यांनी स्वत: पाण्यात उडी घेत दोघांचे प्राण वाचविले आहेत.

माणुसकीचे दर्शऩ़़
नद्या, ओढे भरभरून वाहत आहेत, त्यामुळे सहसा नागरिकांची बाहेरची वर्दळही कमी झाली आहे़ मात्र, ज्यांचे अद्याप खळे झाले नाही, त्यांची ओरड वाढली आहे़ अडचणीत सापडलेल्या दोघांना बाहेर काढण्यासाठी पोना़ धुमाळ यांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून त्या दोघांनाही सुखरूपपणे बाहेर काढले़ त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे़

Web Title: Police rescued two from flood at Nilanga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.