रेणापूरातील तीन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३७ जणांवर गुन्हा

By संदीप शिंदे | Updated: June 29, 2023 16:10 IST2023-06-29T16:10:16+5:302023-06-29T16:10:24+5:30

पोलिसांनी यावेळी ३ लाख ८४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला

Police raid three gambling dens in Renapur; Crime against 37 persons | रेणापूरातील तीन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३७ जणांवर गुन्हा

रेणापूरातील तीन जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा; ३७ जणांवर गुन्हा

रेणापूर : येथील पिंपळफाटा येथे अवैधरित्या सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी दुपारी धाड टाकून ३ लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी ३७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रेणापुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पिंपळ फाटा येथील वेगवेगळ्या ठिकाणी अवैधरित्या पैसे कमावण्याच्या हेतूने जुगार खेळवित व खेळत असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांना मिळाली होती. त्यांच्या मार्गदर्शनानुसार पोलिस पथकाने पिंपळफाटा येथे वेगवेगळ्या तीन ठिकाणी मिलन डे हा जुगार खेळवित व खेळत असताना बुधवारी दुपारी छापा मारला. यावेळी ३७ जणांविरोधात रेणापुर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पोलीस कर्मचारी महेश चव्हाण, सूर्यकांत कलमे, रियाज शेख यांच्या फिर्यादीवरून ३७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना एका ठिकाणी ४० हजाराचा मुद्देमाल, दुसऱ्या ठिकाणी जुगाराचे साहित्य मोबाईल, रोख रक्कम असा एकूण १ लाख ८३ हजार २० रुपयांचा व तिसऱ्या ठिकाणी जुगाराचे साहित्य, मोबाईल, दुचाकी व रोख रक्कम असा १ लाख ६१ हजार २९० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Police raid three gambling dens in Renapur; Crime against 37 persons