मळवटी शिवारातील तिर्रट जुगारावर पोलिसांचा छापा; बारा जुगारी जाळ्यात

By राजकुमार जोंधळे | Updated: February 1, 2024 23:24 IST2024-02-01T23:24:13+5:302024-02-01T23:24:39+5:30

अडीच लाखांचा मुद्देमाल जप्त

Police raid on gambling den in Malvati Shivara; | मळवटी शिवारातील तिर्रट जुगारावर पोलिसांचा छापा; बारा जुगारी जाळ्यात

मळवटी शिवारातील तिर्रट जुगारावर पोलिसांचा छापा; बारा जुगारी जाळ्यात

राजकुमार जोंधळे / लातूर : शहरानजीक असलेल्या मळवटी शिवारात सुरु असलेल्या तिर्रट जुगारावर पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांच्या विशेष पथकाने छापा मारला. यावेळी बारा जुगाऱ्यांना पकडण्यात आले असून, त्यांच्याकडून ११ मोबाईल, जुगाराचे साहित्य असा एकूण २ लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी सांगितले, मळवटी शिवारात एका शेतात जुगार सुरु असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. या माहितीच्या आधारे जिल्हा पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी विशेष पोलिस पथकाला कारवाईचे आदेश दिला. त्यानुसार मळवटी शिवारात पथकाने अचानक छापा मारला. यावेळी बारा जुगाऱ्याना पकडण्यात आले. हे जुगारी स्वतःच्या फायद्यासाठी लोकांकडून पैसे घेऊन तिर्रट नावाचा जुगार खेळत होते. दरम्यान, त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, रोख रक्कम १ लाख २४ हजार १०० रुपये व विविध कंपनीचे ११ मोबाईल (किंमत १लाख ४४ हजार) असा एकूण २ लाख ६६ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

याबाबत विवेकानंद चौक पोलिस ठाण्यात बारा जणांविरुद्ध गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Police raid on gambling den in Malvati Shivara;