शेतातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; २ लाख ४२ हजाराचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST2021-05-28T04:15:57+5:302021-05-28T04:15:57+5:30

पोलिसांनी सांगितले, शिरूर अनंतपाळ शिवारातील मन्मथ कोरे यांच्या शेतात बुधवारी नऊजण जुगार खेळत असल्याची खबर मिळताच पोलीस पथकाने सापळा ...

Police raid on a gambling den on a farm; 2 lakh 42 thousand looted | शेतातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; २ लाख ४२ हजाराचा ऐवज जप्त

शेतातील जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड; २ लाख ४२ हजाराचा ऐवज जप्त

पोलिसांनी सांगितले, शिरूर अनंतपाळ शिवारातील मन्मथ कोरे यांच्या शेतात बुधवारी नऊजण जुगार खेळत असल्याची खबर मिळताच पोलीस पथकाने सापळा रचून अचानक धाड टाकली. पोलीस आल्याचा सुगावा लागताच नऊ जणांनी जुगाराचे साहित्य, रक्कम, मोबाईल, दुचाकी आदी तिथेच टाकून पळ काढला. त्यामुळे सदरील सर्व साहित्याचा पोलिसांनी पंचनामा करून रोख रक्कम ४ हजार ३९० रूपये, तसेच मोबाईल आणि दुचाकी असा एकूण २ लाख ४२ हजार ८१० रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. याबाबत पोहेकाॅ हरीदास पाटील यानी दिलेल्या फिर्यादीवरून नऊजणांविरूद्ध गुरन १३२ / २०२१ कलम १८८, २६९, २७०, भादंवि कलम २, ३, ४ कोविड १९ च्या नियमावलीचे उल्लंघन, तसेच साथरोग कायदाअन्वये कारवाई केली आहे. पुढील तपास तपास पोहेकाॅ पाटील करीत आहेत.

Web Title: Police raid on a gambling den on a farm; 2 lakh 42 thousand looted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.