पाेलिसांचा घरावर छापा; अवैध गुटखासाठा जप्त

By राजकुमार जोंधळे | Updated: September 29, 2023 22:15 IST2023-09-29T22:14:42+5:302023-09-29T22:15:08+5:30

किनगाव पोलिसांची कारवाई

Police house raid; Seizure of illegal Gutkha stock | पाेलिसांचा घरावर छापा; अवैध गुटखासाठा जप्त

पाेलिसांचा घरावर छापा; अवैध गुटखासाठा जप्त

किनगाव (जि. लातूर) : जढाळा येथील एका घरावर गुरुवारी रात्री पाेलिसांनी छापा मारला. यावेळी एकासह गुटख्याचा साठा जप्त करण्यात आला आहे. याबाबत किनगाव पाेलिस ठाण्यात शुक्रवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे.

पाेलिसांनी सांगितले, जढाळा (ता. चाकूर) येथील शरद बाबुराव संगणगिरे यांच्या घरात गुटखा असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे किनगाव ठाण्याच्या पाेलिसांनी गुरुवारी रात्री घरावर छापा मारला. यावेळी गुटखा असलेले पांढऱ्या रंगाचे पाच पोते असा ३२ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल, अन्य एका गुटखा कंपीनचे चार पोते असा १८ हजारांचा मुद्देमाल आणि दुसऱ्या एका पोत्यात गुटखा आढळून आला आहे. किनगाव पोलिसांनी घटनास्थळवरुन एकूण ६६ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई सपाेनि. भाऊसाहेब खंदारे, पोउपनि. गजानन तोटेवाड, पोहेकॉ. व्यंकट महाके, पोना. मल्लिकार्जुन पलमटे, सुनील श्रीरामे, माधवराव दहिफळे यांच्या पथकाने केली आहे.

Web Title: Police house raid; Seizure of illegal Gutkha stock