जळकोट-जाम सीमेवर पोलिसांची नाकाबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:15 IST2021-05-28T04:15:39+5:302021-05-28T04:15:39+5:30
गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून नागरिकांच्या चाचण्या करण्यात येत होती. यामध्ये सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, ...

जळकोट-जाम सीमेवर पोलिसांची नाकाबंदी
गुरुवारी सकाळी ११ वाजेपासून नागरिकांच्या चाचण्या करण्यात येत होती. यामध्ये सर्वांचेच अहवाल निगेटिव्ह आले आहेत. पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे, पोहेकाॅ मुजम्मिल कासार, गणेश माळवदे, गायकवाड आणि आरोग्य विभागाचे कर्मचारी जाम सीमेवर तळ ठोकून आहेत. नांदेड जिल्ह्यातून येणाऱ्या चारचाकी. दुचाकी वाहनाची तपासणी करून ई-पास आहेत की नाही, याची तपासणी केली जात आहे. यामुळे या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, दोन जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात पोलिसांनी नाकाबंदी केल्यामुळे विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांचे करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत. ज्यांच्याकडे पासेस नाहीत अशा लोकांना नियमाप्रमाणे पोलीस प्रशासन व नगरपंचायतच्या वतीने दंड ठोठावण्यात येत आहे. सकाळी सात वाजल्यापासून सायंकाळपर्यंत पोलीस प्रशासन तैनात आहे. या सर्व उपाययोजनांमुळे व प्रतिबंधात्मक कार्यवाहीमुळे जळकोट तालुक्यात कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होत आहे.