प्लॅस्टिक सर्जरी आता सर्वसामान्यांच्या घरात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:15 IST2021-07-15T04:15:36+5:302021-07-15T04:15:36+5:30
९ हजार मोफत शस्त्रक्रिया... गेल्या १७ वर्षांत स्माईल ट्रेन व लहाने रुग्णालयाच्या वतीने ९ हजार मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. ...

प्लॅस्टिक सर्जरी आता सर्वसामान्यांच्या घरात
९ हजार मोफत शस्त्रक्रिया...
गेल्या १७ वर्षांत स्माईल ट्रेन व लहाने रुग्णालयाच्या वतीने ९ हजार मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सर्वाधिक मोफत सर्जरी करणारे हे महाराष्ट्रातील केंद्र बनले आहे. दुभंगलेले ओठ आणि टाळू घेऊन जन्मलेल्या मुलांसाठी आजही मोफत शस्त्रक्रिया होते. त्यासाठी विठ्ठलप्रसाद महाराज, आई-वडील यांचे आशीर्वाद, बंधू पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांची शिकवण आणि डॉ. कल्पना लहाने, डॉ. राजेश शहा आणि सर्व कर्मचाऱ्यांची अमूल्य साथ असल्याचे ते म्हणाले.
व्यंग पूर्ववत करणारी सर्जरी...
प्लॅस्टिक सर्जरीमध्ये सुंदर दिसण्यासाठी केलेली सर्जरी, असा समज आहे. मात्र ही शस्त्रक्रिया एखादे व्यंग पूर्ववत करण्यासाठी केली जाते. अपघातामध्ये तुटलेली नस, काही भागावर निघालेली चमडी, स्नायू तुटणे हे पूर्ववत होऊ शकते. त्यासाठी अपघात झाल्यानंतर लवकरात लवकर रुग्णालयात पोहोचले तर स्नायू जोडले जाऊ शकते.