पोहरेगावात मियावॉकी पद्धतीने २२ हजार ५०० रोपांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:15 IST2021-07-18T04:15:23+5:302021-07-18T04:15:23+5:30

पोहरेगावचे सरपंच गंगासिंह कदम यांच्या पुढाकारातून व गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत गावालगत असलेल्या ...

Planting of 22,500 saplings in Poharegaon by Miyawaki method | पोहरेगावात मियावॉकी पद्धतीने २२ हजार ५०० रोपांची लागवड

पोहरेगावात मियावॉकी पद्धतीने २२ हजार ५०० रोपांची लागवड

पोहरेगावचे सरपंच गंगासिंह कदम यांच्या पुढाकारातून व गावकऱ्यांच्या सहकार्यातून हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत गावालगत असलेल्या जमिनीवर ही झाडे लावली जाणार आहेत. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी उदयसिंह साळुंखे, उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, तहसीलदार राहुल पाटील, गटविकास अधिकारी मनोज अभंगे, पंचायत समितीचे सभापती रमेश सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य उद्धव चेपट यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष शरदराव दरेकर, तालुका कृषी अधिकारी हरिराम नागरगोजे, पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता रबशेट्टी, वृक्ष लागवड समितीचे अध्यक्ष रामराव मोरे, सचिव सदानंद शिंदे, उपाध्यक्ष रामराव सरवदे, शरद राठोड, अंकुश शिंदे, हनुमंत केसरे, पांडुरंग सरवदे, उत्तम शिंदे, बाळकृष्ण मोरे, रामदास कदम, संतोष शिंदे, गणपत केसरे, सुभाष वाघ, किशोर राठोड, विशाल मोरे, संतोष गायकवाड, कमलाकर मोरे, पोहरेगावचे उपसरपंच शंकर राठोड, लालासाहेब मोरे, विकास सरवदे, समाधान गायकवाड आदींची उपस्थिती होती.

इतर गावांनी आदर्श घ्यावा...

जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. म्हणाले, जिल्हा व रेणापूर तालुक्यात वनक्षेत्राची असणारी तूट भरून काढण्यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त ठरणारा आहे. जिल्ह्यातील इतर ठिकाणच्या ग्रामपंचायती आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाचा आदर्श घेऊन आपल्या गावात वृक्ष लागवड करावी आणि त्याचे संवर्धन करावे.

Web Title: Planting of 22,500 saplings in Poharegaon by Miyawaki method